Apple : “आयफोनचं उत्पादन भारतात करू नका”, ट्रम्प यांच्या आवाहनानंतरही अॅपलने भारतात केली मोठी गुंतवणूक एक हजार कोटींचा करार करत एक जागा भाडे करारावर घेतली आहे. आयफोन १७ ची निर्मिती बंगळुरुच्या या प्रकल्पात करण्यात येते आहे. हा प्रकल्प २.८ बिलियन डॉलर्स अर्थात २५ हचार कोटींची गुंतवणूक करुन स्थापण्यात आला आहे. चीननंतर फॉक्सकॉनचं हे दुसरं सर्वात मोठं आयफोन युनिट आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्सकॉनला हा इशारा दिला होता की भारतात कंपनी नको तरीही हा प्रकल्प सुरु कऱण्यात आला आहे. ज्यामुळे हा प्रकल्प चर्चेत आहे. देवनहळ्ळी या ठिकाणी असलेलं युनिट आता चेन्नईच्या प्रकल्पासह काम करणार आहे. या ठिकाणी आयफोन १७ ची निर्मिती करण्यात येते आहे. आयफोन १६ च्या सीरिजच्या निर्मिती आधी हा प्रकल्प या ठिकाणी सुरु करण्यात आला होता.
अॅपल कंपनीने निर्मिती वाढवण्यात आली आहे
अॅपल कंपनी भारताला मॅनुफॅक्चरिंग हब म्हणून आणण्याच्या दिशेने काम करते आहे. कंपनीने या वर्षी आयफोन निर्मितीचे ६ कोटी युनिनपर्यंत नेण्याची तयारी दर्शवली आहे. २०२४-२५ मध्ये ही संख्या ४ कोटी युनिट होती. २०२५ च्या आर्थिक वर्षात अॅपलने भारतात ६० टक्क्यांहून अधिक आयफोन असेंबल केले. ज्यांची किंमत २२ अब्ज डॉलर्स इतकी होती.
अमेरिका बाजारात भारत आघाडीवर
भारत आता चीनला मागे टाकत अमेरिकेला स्मार्टफोनचा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. एका रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत अमेरिकेत आयात झालेल्या स्मार्टफोनपैकी तब्बल ४४ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ होते. गेल्या वर्षी ही टक्केवारी फक्त १३ टक्के होती. दुसरीकडे, चीनचा हिस्सा याच कालावधीत ६१ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
भारत आयफोन मॅन्युफॅक्चरिंग हबकडे वाटचाल करत
जून २०२५ पर्यंत भारतात २.३९ कोटी आयफोन तयार झाले असून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ७८ टक्के आयफोन भारतातच बनवले जात आहेत. २०२४ च्या तुलनेत या उत्पादनात तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एका रिसर्च अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात भारतातून निर्यात झालेल्या आयफोनची संख्या २.२८ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.५० कोटी होता, म्हणजेच वार्षिक तुलनेत ५२टक्के वाढ झाली आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढल्यामुळे भारत आयफोन उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात झपाट्याने जागतिक हब बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.