आज जवळपास प्रत्येकाला स्मार्टवॉच खरेदी (buying smartwatch) करायचे असते. विविध कंपन्यादेखील ग्राहकांसाठी नवनवीन डिझाईन आणि फिचर असलेले स्मार्टवॉच घेऊन येत असतात, जे फक्त फॅशन म्हणून नाही तर आरोग्यासाठी उपयुक्त असतात. तर आता ॲपल कंपनी ग्राहकांसाठी एक खास स्मार्टवॉच घेऊन आली आहे.

ॲपल कंपनीने नवीन स्मार्टवॉचसाठी एक बोल्ड कलर सादर केला आहे. हे स्मार्टवॉच लाल रंगाचे आहे. त्यावर ॲल्युमिनियम केस आणि लाल स्पोर्ट बँड आहे. हे नवीन ॲपल वॉच सिरीज ९ ‘उत्पादन रेड’ (Product 9) हे ॲपलच्या उत्पादनांच्या सहाय्यकच्या लाइनअपमध्ये सामील झाले आहे. रेड हा एक ग्लोबल फंड आहे, जो एचआयव्ही/एड्स विरुद्ध लढा देतो.

PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
Central Railway, Central Railway crowd Planning,
रेल्वे गाड्यांच्या डब्यात बदल
Raid on shop selling fake Puma brand materials pune news
‘प्यूमा ब्रँड’चे बनावट साहित्य विकणाऱ्या दुकानावर छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
tata motors launches re wi re vehicle scrapping facility in pune
टाटांची पुण्यात अभिनव ‘रिवायर’ सुविधा; वर्षाला २१ हजार जुनी वाहने भंगारात काढण्याची क्षमता
skoda Kylaq suv launched know its price and varients google trends
Skoda Kylaq SUV: स्कोडाने केली सगळ्यांची बोलती बंद! सर्वात स्वस्त एसयूव्ही झाली लाँच, किंमत फक्त…
number of distilling factories in state gone up to 186 this year Last season 207 factories have distilled
गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या घटली हंगामालाही अपेक्षित गती नाही; अद्याप परवाने देणे सुरू

१ डिसेंबर जागतिक एड्स दिनापूर्वी ॲपल स्मार्टवॉचच्या या नवीन रंगाचे अनावरण करण्यात आले आहे. ॲपल वॉच सीरिज ९मध्ये आरोग्य सेन्सर्स आणि सुरक्षा वैशिष्ट्ये अपग्रेड केली आहेत. यामध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, ईसीजी (ECG) क्षमता, फॉल डिटेक्शन, इमर्जन्सी एसओएस आणि अल्ट्रा-वाइडबँड तंत्रज्ञान वापरून हरवलेला आयफोन शोधण्यात मदत आदी खास गोष्टींचा समावेश आहे. ज्यांना फिटनेसची आवड आहे, त्यांच्यासाठी हे वॉच उत्तम ठरेल. कारण वापरकर्त्यांना त्यांचे लक्ष गाठण्यासाठी यात वर्कआऊट ट्रॅकिंग, रनिंग मेट्रिक्स उपलब्ध आहेत.

हेही वाचा…गूगलवर आहे खास ‘Hidden’ ॲप! पाहू शकता हवामानाचा अंदाज; कसे इन्स्टॉल कराल? जाणून घ्या….

ॲपल कंपनीचे नवीन रेड वॉच सोलर ॲनालॉगसह खास जागतिक एड्स दिनानिमित्त लाँच केले आहे. ॲपल कंपनी २००६ पासून (RED) रेडसह पार्टनरशिप करत आहे. (उत्पादन) रेड खरेदीतून मिळणारे उत्पन्न ग्लोबल फंडद्वारे सब-सहारा एरिकामध्ये एचआयव्ही/एड्स कार्यक्रमांसाठी फंड देण्यात मदत करते. १ डिसेंबरपासून ते ८ डिसेंबरपर्यंत ॲपल कंपनी ॲपल पेद्वारे केलेल्या प्रत्येक खरेदीसाठी $१ डॉलरदेखील डोनेट करणार आहेत. ॲपलचा आयफोन १४ बरोबर ॲपल वॉच सीरिज ९ रेड आता ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. तुम्ही ते ॲपल.कॉम, ॲपल स्टोअर, ॲपल स्टोअर ॲपवरून खरेदी करू शकता…

Story img Loader