scorecardresearch

तंत्रज्ञानाचा वापर असाही! चॅटजीपीचा वापर करुन प्रसिद्ध लेखकाने लिहिली तब्बल १०० पुस्तकं; एका वर्षामध्ये कमावले ‘इतके’ पैसे

ChatGPT च्या मदतीने या तरुण लेखकाने वर्षभरात १०० पुस्तकं लिहून प्रकाशित केली आहेत.

chatgpt
चॅटजीपीटी (संग्रहित फोटो)

मानवाला दैनंदिन कामांमध्ये मदत व्हावी यासाठी A.I. तंत्रज्ञानाचा वापर करुन ChatGPT ची निर्मिती करण्यात आली. या चॅटबॉटचा वापर मागील काही महिन्यांपासून वाढला आहे. चॅटजीपीटीच्या मदतीने लोक विविध काम करत असल्याचे पाहायला मिळते. या नव्या तंत्राबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे. लोक घरगुती कामांसह ऑफिसमध्येही स्मार्ट असिस्टंट म्हणून चॅटबॉटचा वापर करत आहेत. चॅटजीपीटीमुळे अनेकांचे काम सुखकर झाले आहे. अशातच एका लेखकाच्या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे. या लेखकाने चॅटजीपीटीच्या मदतीने सुमारे १०० पुस्तकं लिहिली आहेत.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, चॅटजीपीटी यांसारख्या A.I. Tools च्या मदतीने टीम बाउचर नावाच्या लेखकाने तब्बल १०० पुस्तकांची निर्मिती केली आहे. रोमांचक ई-पुस्तकं तयार करणे हे यामागील ध्येय्य होते असे टीम सांगतो. बाउचर या पुस्तकांना AI Lore series असे म्हणतो. “पुस्तकातील कथा या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटेड विश्वाशी जोडलेल्या आहेत. A.I. मुळे मानवी सर्जनशीलता वाढण्यासाठी मोठी मदत होते”, असे त्याने म्हटले आहे. न्यूजवीकच्या एका लेखामध्ये त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्राची स्तृती केली आहे.

आणखी वाचा – Netflix चा मोठा निर्णय! कंपनीने पासवर्ड शेअर करण्यावर घातली बंदी, अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी भरावे लागतील जास्तीचे पैसे

टीम बाउचरने माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितले की, “सुरुवातीला एकदा मी A.I.चा वापर करुन तीन तासांपेक्षा कमी वेळामध्ये एक पुस्तक लिहून संपवलं होतं. चॅटबॉट आणि इमेज जनरेटर यांच्या सहाय्याने लेखन जलदगतीने पूर्ण होते. शिवाय सुंदर चित्रदेखील तयार केले.” टीमच्या प्रत्येक पुस्तकामध्ये सुमारे ५,००० शब्द आहेत. तसेच त्यामध्ये A.I. जनरेटेड फोटोंचा समावेश आहे. ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ या काळामध्ये टीमने आपल्या कथांच्या ५०० पेक्षा जास्त प्रती विकल्या आहेत. यातून त्याने २,००० डॉलर्सची कमाई केली आहे. सोशल मीडियावर टीम बाउचरची ही गोष्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या