आजकाल प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे. अशातच या फोनची बॅटरी सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु जास्त वेळ फोन चार्ज करणे देखील हानिकारक आहे. आपला फोन चार्ज करण्यासंबंधी अनेक सल्ले दिले जातात. जर तुम्हाला देखील तुमच्या फोनमध्ये बॅटरी बॅकअप संबंधी समस्या जाणवत असतील तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ टिकवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोन गरम होऊ देऊ नये

स्मार्टफोनमध्ये लिथियम आयर्न बॅटरी असते. म्हणूनच फोन जास्त गरम होऊ देऊ नये. जास्त ऊन किंवा गरम तापमान असणाऱ्या ठिकाणी फोन ठेवू नये. कारण अशा वेळी तुमचा फोन घातक ठरू शकतो. गेम खेळताना तुम्ही तुमचा फोन चार्ज करणे देखील टाळावे, कारण यामुळे फोनचे तापमान वाढेल आणि बॅटरी खराब होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad battery backup of your phone some tips to improve it pvp
First published on: 02-02-2022 at 15:45 IST