Tech Industry Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. आता प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असणारी मायक्रोसॉफ्टने आधीच आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी पुन्हा एका टाळेबंदी करण्याच्या तयारीत आहे. यावेळेला कंपनीतील ६८९ कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉशिंग्टन स्टेट एम्प्लॉयमेंट सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्ट त्यांच्या सिएटल क्षेत्रीय कार्यालयातून ६८९ कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या रेडमंड, बेलेव्ह्यू आणि इसाक्वा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या टाळेबंदीचा फटका बसणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये मायक्रोसॉफ्टने वॉशिंग्टन राज्याला कळवले की ८७८ कमर्चाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील कपात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत २,१८४ इतकी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

द व्हर्जच्या टॉम वॉरेनच्या म्हणण्यानुसार ज्या विभागांमध्ये कमर्चारी कपात होणार आहे त्यामध्ये व्हिज्युअल स्टुडिओ, एंटरटेनमेंट आणि डिव्हाइसेस, अझूर एज+ प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात Xbox, Surface आणि HoloLens विभागातील काही कर्मचारी प्रभावित झाले होते. मागील कपातीप्रमाणेच या वेळीही बडतर्फ कर्मचार्‍यांना अनेक फायदे दिले जाणार आहेत. तसेच कमर्चाऱ्यांना ६० दिवसांचा नोटीस पिरियड देखील मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनी – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

यंदाच्या वर्षात कमर्चारी कपातीचा सामना करण्याची कंपनीची काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी कंपनीतील Xbox आणि Hololens विभाग देखील फेब्रुवारीमध्ये प्रभावित झाले होते. GitHub, GitLab आणि Yahoo याही प्रमुख टेक कंपन्यांपैकी आहेत ज्यांना टाळेबंदीचा सामना करावा लागला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये आणखी टाळेबंदी झालेली दिसून येऊ शकते.

हेही वाचा : Layoffs In 2023: Apple पासून Microsoft पर्यंत ‘या’ कंपन्यांनी केली कर्मचाऱ्यांची कपात, पाहा संपूर्ण यादी

या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या १०,००० कर्मचाऱ्यांच्या कपाती ची घोषणा केली होती. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या हे प्रमाण ५ टक्के आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेता हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big tech company microsoft layoff 689 employees affected in supply chain tmb 01
First published on: 13-03-2023 at 11:16 IST