BSNL Cinema Plus: सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलतर्फे ओवर द टॉर म्हणजेच ओटीटी रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या नवीन रिचार्जला सिनेमाप्लस रिचार्ज प्लॅ नाव देण्यात आले आहे. हा सिनेमा प्लॅन Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारख्या ओटीटी फ्लॅटफॉर्मसोबत भागिदारीने लॉन्च केला आहे. याचाच अर्थ असा की आता ग्राहकांना आता एकाच रिचार्जमध्ये एकापेक्षा जास्त ओटीटी अ‍ॅप्स वापरता येणार आहे. यासाठी ग्राहकांना वेगवेगेळे रिजार्च करण्याची आवश्यकता नाही. बीएसएनएलने तीन नवीन रिजार्जचा प्लॅन सुरू केला आहे. चला सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसएनएलचा सिनेमाप्लस स्टार्टर पॅक

या पॅकची किंमत सध्या ४९ रुपये आहे पण प्रत्यक्षात त्याची किंमत ९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये साधारण ७ ओटीटी अ‍ॅप्सच्या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. तसे हा प्लॅन Lionsgate, ShemarooMe, Hungama आणि EpicOn सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्याची संधी देते.

हेही वाचा – Instagramवर आलं भन्नाट फिचर, आता कमेंट करणे होणार आणखी मजेशीर, कसं ते जाणून घ्या

बीएसएनएलचा सिनेमाप्लस फुल पॅक

या रिचार्ज प्लॅची किंमत १९९ रुपये इतरी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV आणि Hotstar ओटीटी अ‍ॅप्स वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे

बीएसएनएलचा सिनेमाप्लस प्लॅक

या रिचार्ज प्लॅनची किंमत २४९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला ZEE5 प्रीमियम, SonyLIV प्रीमियम, YuppTV, Shemaroo, Hungama, Lionsgate आणि Hotstar या अ‍ॅप्सचा वापर करु शकतात.

हेही वाचा- कर्माची फळं इथेच भोगावी लागतात; दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडून चोर… अंगावर काटा येणारा Video पहा

कसे करावा वापर

सिनेमाप्लस रिचार्ज प्लॅनसाठी यूजर्सकडे बीएसएनएसचा अ‍ॅक्टिव्ह फायबर कनेक्शन असले पाहिजे. यामध्ये ग्राहक आपल्या गरजेनुसार सिनेमाप्लस प्लॅनचा रिचार्ज करू शकता. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ज मोबाईल नंबरने कंटेंट वापरू शकता.

पैशांची होईल बचत
बीएसएनएलच्या मते, अशा प्रकारच्या प्लॅनमुळे ग्राहकांचे पैसे वाचतील आणि वेगवेगळे रिचार्जमध्ये जास्त पैसे द्यावे लागणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl cinema plus new plan avail seven ott apps in one recharge of rs 49 snk
First published on: 18-05-2023 at 20:23 IST