Asus Chromebook Laptop: स्वस्त किंमतीत लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सध्या लॅपटॉपला एक्सचेंज ऑफर अंतर्गत खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. या फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या ऑफरमुळे लॅपटॉप केवळ दोन हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ही सूट ‘Asus Chromebook Celeron Dual Core’ वर दिली जात आहे. नवीन लॅपटॉप फ्लिपकार्टवर खास ऑफरसह केवळ दोन हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मात्र, यासाठी तुमच्याकडे जुना लॅपटॉप असणे आवश्यक आहे जो तुम्हाला एक्सचेंज करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटच्या रूपात सर्वात मोठ्या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

काय आहे खास ऑफर?

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच

फ्लिपकार्ट डीलमध्ये ग्राहकांना Asus Chromebook Celeron Dual Core लॅपटॉप अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या Chromebook ची किंमत २२,९९० रुपये आहे पण त्यावर १७ टक्के सवलत मिळत आहे. सध्या हा लॅपटॉप डिस्काउंटसह १८,९९० रुपयांना सूचीबद्ध आहे.

आणखी वाचा : Cheapest 5G Smartphone: Lava ने लॉंच केला देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; 50 MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह मिळणार बरचं काही…

हा लॅपटॉप खरेदी करताना तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुने डिव्हाइस असल्यास, फ्लिपकार्ट १७,००० रुपयांपर्यंत संपूर्ण एक्स्चेंज डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला या सवलतीचा पूर्ण फायदा मिळाला तर नवीन लॅपटॉपची किंमत १८,९९० रुपयांऐवजी फक्त १,९९० रुपये असेल. मात्र हे लक्षात घ्या की, एक्सचेंज ऑफरसह मिळणारा फायदा जुन्या लॅपटॉपच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असतो.

या लॅपटॉपमध्ये, ग्राहकांना ११.६ इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. याचे वजन केवळ १ किलोग्रॅम आहे. हा लॅपटॉप वजनाने हलका आहे आणि तुम्ही तो सहज कॅरी करू शकता. यात ४ जीबी रॅम व्यतिरिक्त यात ३२जीबी EMMC इंटर्नल स्टोरेज आहे.