scorecardresearch

केवळ २३ हजारांमध्ये मिळेल अ‍ॅपलचा ‘हा’ ५ जी फोन, जाणून घ्या ही जबरदस्त ऑफर

फ्लिपकार्टचा आता बिग बिलियन डे सेल संपला आहे. तुमची आयफोन घेण्याची संधी हुकली असेल तर दसरा सेल सुरू आहे. यामध्ये अ‍ॅपलचा आयफोन १२ मिनी मोठ्या सूटसह मिळत आहे.

iPhone-12-mini
आयफोन

दमदार कॅमेरा, उत्तम सुरक्षा प्रणालीमुळे अ‍ॅपल हा फोन ग्राहकांच्या गळातल्या ताईतच झाला आहे. नुकतेच अ‍ॅपलने आपली आयफोन १४ सिरीज लाँच केली. त्यामुळे १३ सिरीज आणि त्याखालील मॉडेल्सची किंमत घसरली आहे. त्यातच ईकॉमर्स कंपन्यांनी आपल्या सेलमध्ये अजून सूट दिली. याने चाहत्यांना फोन मिळवण्याची सुवर्ण संधीच मिळाली. मात्र फ्लिपकार्टचा आता बिग बिलियन डे सेल संपला आहे. तुमची आयफोन घेण्याची संधी हुकली असेल तर दसरा सेल सुरू आहे. यामध्ये अ‍ॅपलचा आयफोन १२ मिनी मोठ्या सूटसह मिळत आहे.

आयफोन १२ मिनीवर चक्क १९ हजार ९१० रुपयांची सूट

APPLE IPHONE 12 MINI हा फ्लिपकार्टच्या बिग दसरा सेलमध्ये मोठ्या सूटसह मिळत आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर फोनची लिस्टेड प्राईस ही ५९ हजार ९०० रुपये इतकी आहे. पण फोनवर ३३ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सूटसह किंमत आता ३९ हजार ९९० रुपये इतकी झाली आहे. अन्य ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्हाला ही किंमत आणखी कमी करता येणार आहे.

१६ हजार ९०० रुपयांचा मोठा एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्टने आयफोन १२ मिनीवर एक मोठा एक्सचेंज ऑफर दिला आहे. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी फोन असल्यास त्यावर तुम्हाला १६ हजार ९०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. याने आयफोन १२ मिनीच्या किंमतीमध्ये मोठी घट होत आहे. आयफोन १२ मिनीची किंमत घटून २३ हजार ९० रुपये इतकी होते. पण या ऑफरवर काही अटी आहेत. या ऑफरवर किती सूट मिळणार हे स्मार्टफोनचे मॉडल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

फोनवर मिळत आहेत हे बँक ऑफर

३९ हजार ९९० रुपयांच्या आयफोन १२ मिनीवर तुमची आणखी बचत होऊ शकते. एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरील नॉन ईएमआई ट्रॅन्झॅक्शनवर ५०० रुपये, तर ईएमआय ट्रॅन्झॅक्शनवर १ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. त्याचबरोबर, ग्राहकांना २९ हजार ९९९ रुपयांवरील ऑर्डरवर ७५० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. ही सुवर्ण संधी सोडू नका, आणि आयफोन घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 12:20 IST