गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत ८,००६ नागरिक ठार झाले असून सुमारे १३,२८७ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार सांख्यिकीवरुन मिळत आहे. युक्रेनने वर्षभर खूप काही सहन केले आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम केला आहे. या युद्धाबाबत भारताचे माजी परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी ChatGpt कडून सामंजस्य पत्र सादर करण्यासाठी काही सूचना मागवल्या आहेत. यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चॅटजीपीटी म्हणजे नक्की काय आहे आणि विकास स्वरूप यांनी मागवलेल्या सूचना आणि त्यावर शशी थरूर यांनी दिलेली प्रतिक्रिया या बद्दल जाणून घेऊयात.

 सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच चॅटजीपीटी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात गेमचेंजर ठरणार आहे.

हेही वाचा : ChatGPT मुळे माणसांच्या नोकऱ्या जाणार का? इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं मोठं विधान; म्हणाले…

रशिया-युक्रेनच्या युद्धात मध्यस्थी योजना तयार करण्यासाठी ChatGpt ला भारताचे माजी परराष्ट्र सचिव आणि सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकाचे लेखक विकास स्वरूप यांनी सांगितले होते. यावर काँग्रेसचे शशी थरूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ही कल्पना चांगली आहे. परंतु वेगवगेळी विचारसरणी असलेले दोन्ही नेते या सूचनांची अंमलबजावणी करतील का ? तसेच ते म्हणाले मुख्यतः रशियन लोकांकडून चॅटजीपीटी फॉर्म्युलेशनवरील अनेक आक्षेपांचा मी विचार करू शकतो. मात्र हा एक चांगला प्रयोग आहे.

विकास स्वरूप यांनी मागवलेल्या सूचनांवर AI Chatbot ने संभाव्य असे ८ पॉईंट हे उत्तरासह दिले आहेत. यामध्ये यामध्ये रशियन भाषिक प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्तेचे विकेंद्रीकरण याचा समावेश होता. तसेच दोन्ही पक्षांना स्वीकारण्यायोग्य उपाय शोधणे हे आव्हानात्मक असल्याचे चॅटबॉटने कबूल केले.

हेही वाचा : ChatGpt News: गुगल इंजिनीअरने बनवले Gita Gpt; जाणून घ्या कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरे

चॅटजीपीटीने म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या नेत्यांमधील चर्चा हे संघर्ष सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल असावे. यासाठी दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली पाहिजे. चॅटजीपीटीने युक्रेनची अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक यांसारख्या जागतिक वित्तीय संस्थांकडून आरटीईक मदतीची मागणी केली आहे. तसेच रशियाने युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अंखडता ओळखली पाहिजे असेही चॅटजीपीटीने सुचवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ChatGPT पुढे म्हणाले की, रशियाने युक्रेनमधील रशियन भाषा बोलणाऱ्यांच्या सांस्कृतिक अधिकारांच्या रक्षणासाठी रशियाने आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत काम केले पाहिजे. जसे की शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात रशियन भाषेचा वापर करण्यास परवानगी देणे. तसेच चॅटजीपीटीने सैन्य मागे घेण्याचेही आवाहन या सूचनांमधून केले आहे.