गुगलला टक्कर देणारे चॅट जीपीटी (ChatGPT) सध्या चांगलेच ट्रेंडला आहे. टेक विश्वात धुमाकूळ घालणारे चॅटजीपीटी एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स आहे. जे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात देते. या चॅट जीपीटीवर आपल्या गुगलप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात याचा मोठा वापर होतोय, यासाठी युजर्सना वेबसाइट ओपन करत वेब अ‍ॅडरेस टाइप करावा लागतो. पण प्रत्येक वेळी वेब ओपन करून AI Chatbot चा वेब अ‍ॅडरेस टाइप करणे त्रासदायक ठरते. हाच त्रास कमी करण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने मॅक (Mac) युजर्ससाठी मॅकजीपीटी (MacGPT) नावाचे नवीन macOS अ‍ॅप तयार केले आहे.

या अ‍ॅपच्या मदतीने मॅक युजर ChatGPT च्या सुविधेचा वापर करु शकणार आहेत. अहवालानुसार, iPhones आणि iPad युजर्स Siri च्या जागी आता ChatGPT चा वापर करु शकतात.

how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
Fujiyama EV Classic launched
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल; ११० किमी रेंज, बुकींगही सुरु, किंमत फक्त…
India Post Payments Bank Recruitment 2024
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, अर्जाची प्रक्रिया

डेव्हलपर जॉर्डी ब्रुइनने मॅक युजर्सना चॅटबॉटच्या मदतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळवून देण्यासाठी MacGPT तयार करण्यात आले आहे. अ‍ॅपल इनसाइडरच्या माहितीनुसार, अ‍ॅप मॉन्टेरी आणि व्हेंचुराच्या मॅकओएस (macOS) व्हर्जनवर याचा वापर करता येईल.

Mac वर ChatGPT चा वापर कसा करायचा?

युजर्सना MacGPT डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम Burins Gumroad पेजवर जावे लागेल. हे अ‍ॅप विनामूल्य उपलब्ध आहे. डाउनलोड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी युजर्सना आता मेल आणि इतर माहिती द्यावी लागेल. एखाद्या युजरने आधीच OpenAI अकाउंट किंवा ChatGPT Plus सेट केले आहे, तर ते समान क्रेडेन्शियल वापरून MacGPT मध्ये लॉग इन करू शकतात.

Mac मध्ये युजरला Siri च्या जागी जर ChatGPT वापर करायचा असेल तर त्याला OpenAI प्लॅटफॉर्मवर सिक्रेट की जनरेट करावी लागेल, त्यानंतर वेबवरील Yue-Yang च्या Github वर जावे लागेल आणि ChatGPT -Siri नावाच्या पोस्टचा शॉर्टकट डाउनलोड करावा लागेल. नंतर तो शॉर्टकट म्हणून सेट करावा लागेल आणि ChatGPT API कोड टाकावा लागेल.