scorecardresearch

Holi 2022 : होळीच्या दिवशी कॅशबॅक ऑफरच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, सरकारने जारी केला अलर्ट

तुम्हालाही असाच एसएमएस किंवा सोशल मीडिया पोस्ट आला असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण या जाहिराती आणि एसएमएसमध्ये दिलेल्या लिंकवरून खरेदी केल्याने तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

Cyber-crime-1

देशभरात होळीचा सण सुरू झाला आहे, लोक ओळखीच्या लोकांना आणि मित्रांना होळीच्या शुभेच्छा पाठवत आहेत. यासोबतच अनेकजण होळी साजरी करण्यासाठी ऑनलाइन खरेदी करत आहेत, याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी खोट्या कॅशबॅक ऑफरचे एसएमएस आणि जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. तुम्हालाही असाच एसएमएस किंवा सोशल मीडिया पोस्ट आला असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण या जाहिराती आणि एसएमएसमध्ये दिलेल्या लिंकवरून खरेदी केल्याने तुमचे खाते रिकामे होऊ शकते.

सायबर दोस्तकडून अलर्ट – भारत सरकारचे ‘सायबर दोस्त’ नावाचे ट्विटर हँडल आहे. या ट्विटर हँडलद्वारे सरकारकडून सायबर फसवणुकीबाबत अलर्ट जारी केले जातात. नुकतेच सायबर दोस्तने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सायबर गुन्हेगार तुम्हाला कॅशबॅक आणि डिस्काउंटच्या मेसेजद्वारे फसवणुकीचे बळी बनवू शकतात.

आणखी वाचा : Holi 2022 Tips: होळीच्या वेळी स्मार्टफोन, हेडफोन आणि इतर उपकरणे अशा प्रकारे ठेवा सुरक्षित

फसवणूक कशी करतात
सायबर गुन्हेगार प्रथम लोकांना आकर्षक ऑफरद्वारे दिलेल्या लिंकवर जाण्यास भाग पाडतात. यानंतर, तुम्ही लिंकवर जाताच, सायबर गुन्हेगारांना तुमच्या मोबाईलमधील सुरक्षित माहिती मिळते आणि या माहितीच्या आधारे इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि इतर ऑनलाइन व्यवहारांच्या आयडी पासवर्डच्या मदतीने तुमचे संपूर्ण खाते रिकामे केले जातात.

आणखी वाचा : BSNL चा ३६५ दिवसांचा प्लॅन, १२० GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या ऑफर

ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची?
जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून आकर्षक ऑफर असलेला एसएमएस आला तर त्यामध्ये दिलेल्या लिंकला भेट देऊ नका. यासोबतच सोशल मीडियावर आकर्षक ऑफर्सची पोस्ट तुमच्या आयडीसह शेअर करू नका. यासोबतच ऑनलाइन शॉपिंगसाठी फक्त विश्वसनीय वेबसाइट वापरा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cheating can happen in the name of cashback offers on holi government issued alert prp

ताज्या बातम्या