BEST CAMERA SMARTPHONES 2022 : आनंदाचे, सुखाचे क्षण टिपण्यासाठी स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फोन घेताना लोक आधी कॅमेरा क्वालिटी आणि त्याचे पिक्सेल याला महत्व देतात. तुम्ही फोन घेण्याच्या विचारात असाल आणि उत्तम कॅमेरा याला तुम्ही प्रधान्य देत असाल तर आज आम्ही २०२२ वर्षातील काही Best camera smartphones बाबत माहिती देत आहोत. ही माहिती तुम्हाला बेस्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्यासाठी मदत करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) गुगल पिक्सेल ७ प्रो

Google Pixel 7 pro मध्ये ५ एक्स टेलिफोटो लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ४८ एमपी आणि १२ एमपी सेन्सर मिळतो. ऑटोफोकससह अपडेटेड अल्ट्रावाइड लेन्समध्ये मॅक्रो फोकस मिळतो. दूरून उच्च गुणवत्तेचे छायाचित्र निघण्यासाठी स्मार्टफोनमध्ये ३० एक्स सुपर रेस झूम देण्यात आला आहे. फोनमध्ये १० एचडीआर व्हिडिओ, सिनेमॅटिक ब्लर, सिनेमॅटिक प्लान, स्लोमोशन, २४० एफपीएस पर्यंत स्लो मोशन व्हिडिओ सपोर्ट, स्टॅबिलायझेशनसह ४ के टाइमलॅप्स हे व्हिडिओ फीचर्स मिळतात. फोनची किंमत ८४ हजार ९९९ रुपये आहे.

(नवीनच लाँच झालेल्या ‘OnePlus TV Y1S Pro’वर मोठी सूट; ५५ इंच स्क्रीन, २३० लाइव्ह चॅनल्स, किमतही परवडणारी)

२) आयफोन १४ प्रो मॅक्स

Apple iPhone 14 Pro Max स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यात ४८ एमपीचा मेन सेन्सर आणि तीन १२ एमपी सेन्सर मिळतात. ४८ एमपी प्रायमरी कॅमेऱ्याला एफ/1.78 अपर्चर असून दुसऱ्या पिढीचे सेन्सर शिफ्ट ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देते. फोनमध्ये फोटोनिक इंजिन, डीप फ्युजन, स्मार्ट एचडीआर ४, डेप्थ कंट्रोल आणि अडव्हान्स्ड बोकेहसह पोर्ट्रेट मोड हे कॅमेरा फीचर्स मिळतात. सेल्फीसाठी फोनमध्ये एफ/१.९ अपर्चरसह १२ एमपी कॅमेरा मिळतो.

३) सॅमसंग गॅलक्सी एस २२ अल्ट्रा

Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यात १०८ एमपी प्रायमरी कॅमेऱ्याचा समावेश असून १२, १० आणि १० एमपी असे तीन सेन्सर मिळतात. फोनमध्ये सुपर स्टेडी फीचर मिळते जे वाइड अँगलमध्ये कमेरा थरथरत असल्यास त्यास सुधारते आणि गती स्थिर करण्यासाठी एकाधिक वस्तूंचा देखील मागोवा घेत प्रत्येक फ्रेममधील अस्पष्टता दूर करते. फोनमध्ये सुपर एचडीआर डिस्प्ले असून त्यात सेल्फीसाठी ४० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

(..म्हणून कदाचित IPHONE 15 मध्ये USB TYPE C CHARGER मिळणार नाही)

४) विवो एक्स ८० प्रो

Vivo X80 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅन ८ जेन १ प्रोसेसर, एफ/१.५७ अपर्चरसह ५० एमपी मेन कॅमेरा, एफ/२.२ अपर्चरसह ४८ एमपी, एफ/1.85 अपर्चरसह १२ एमपी कॅमेरा आणि एफ/3.4 अपर्चरसह ८ एमपी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ZEISS सिनेमॅटिक व्हिडिओ बोकेह सिस्टिम मिळतो ज्याद्वारे व्हिडिओ बनवताना नाविन्यपूर्ण बोकेह आकार पुन्हा तयार करता येते. याने ड्रिमलाइक इफेक्ट मिळतो. हा फोन ७९ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

५) ओप्पो रेनो ८ प्रो

Oppe Reno 8 Pro स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे. स्मर्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सरसह ५० एमपी रिअर कॅमेरा आणि ३२ एमपी फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये फिल्टर, ऑटो एन्हान्स, कट अँड रोटेट, स्टिकर्स डूडल, इरेजर आणि इतर फोटो एडिटिंग फीचर्स मिळतात.

(‘हे’ अ‍ॅप सेल्फीला देते पेंटिंगसारखा लूक; कुठेही अपलोड केल्यावर व्हाल लोकप्रिय, असा करा वापर)

६) मोटोरोला एज ३० अल्ट्रा

Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा पिक्सेल तंत्रज्ञानासह २०० एमपीचा कॅमेरा मिळतो. या कॅमेऱ्याने 4K HDR10+ फुटेज काढता येते. फोनमध्ये ५० एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि १२ एमपी टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा लेन्स मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ६० एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ५४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Check best smartphone cameras of year 2022 ssb
First published on: 10-12-2022 at 17:50 IST