आधारकार्ड नंतर पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधारकार्डचा वापर हा ओळखपत्र म्हणून केला जातो तर पॅनकार्ड वित्तीय घेवाणदेवाण करण्यासाठी वापरले जाते. पॅनकार्डचा अधिक वापर तेच लोक करतात ज्यांचे बँकिंग व्यवहार किंवा आयटीआरच्या संबंधित काही काम असेल. पॅनकार्ड आपली वित्तीय स्थितीदेखील दर्शवतो. याच्याच मदतीने बँक लोन घेणाऱ्या ग्राहकाचे क्रेडिट स्कोर माहित करून घेतले जातात. तसेच, पॅनकार्डशिवाय कोणताही मोठा व्यवहार आणि शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्रीही करता येणे शक्य नाही.

पॅनकार्डशिवाय विमा पॉलिसी, ईपीएफचे पैसे, पेन्शन सारखी कामेही आपण करू शकणार नाही. जर तुम्हीसुद्धा पॅनकार्ड वापरकर्ते आहेत तर तुम्हाला या सर्व कामांसाठी पॅनकार्डचा वापर करत असाल. यादरम्यान बरेचदा तुम्हाला अशी शंका येत असेल की तुमच्या पॅनकार्डचा कोणी गैरवापर तर करत नसेल ना?

UIDAIने घेतला मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ PVC आधार कार्ड नसतील वैध, जाणून घ्या कारण

चुकीच्या माणसाच्या हातात आपले पॅनकार्ड आल्यास त्याचा चुकीचा वापर केला जातो. या कार्डचा वापर वित्तीय कामांसाठी केला जात असल्याने याला योग्यप्रकारे सांभाळून ठेवणे आणि त्याची वापराचा इतिहास तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर याचा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो. पॅनकार्डच्या मदतीने लोक मोठे घोटाळे करू शकतात. अनेकदा लोक दुसऱ्याचे कार्ड वापरून कोणत्याही व्याकरीच्या कर्जाचे जामीनदार बनू शकतात. असे केल्याने तुम्ही करासाठी जबाबदार असाल आणि तुम्हाला त्याचा करही भरावा लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुमच्या पॅनकार्डचा वापर कोणत्या व्यक्तीने केला असेल आणि त्याने मोठ्या रकमेचा व्यवहार केला असेल तर त्याचा तपशील फॉर्म २६एएस मध्ये दिसेल. याचा वापर करून तुम्ही पॅनकार्डच्या चुकीच्या वापराचा शोध लावू शकता. हा फॉर्म तुम्ही नक्की डाउनलोड करा. TRACES च्या पोर्टलवरूनही तुम्ही हा फॉर्म मिळवू शकता. हा फॉर्म डाउनलोड केल्यावर व्यवहार तपासा. यानंतर आपल्याला पॅनकार्डचा गैरवापर झाला आहे की नाही याबाबत माहिती मिळेल.