Tech Layoff: सध्या अनेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये सुरु असलेल्या मंदीचा आयटी कंपन्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. करोना नंतर मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरती केली होती. या कर्मचारी कपातीमध्ये आणखी एका आयटी कंपनीचा समावेश झाला आहे.

जगातील अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आतापर्यंत लोकहो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता Cognizant कंपनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३,५०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. याआधी google, Meta , Amazon यासारखया अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : AI मुळे नोकरी गमावण्यास सुरुवात! IBM चे ७ हजारपेक्षा जास्त कर्मचारी होणार बेरोजगार, CEO म्हणाले, “येत्या काही…”

खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही ऑफिसेस देखील बंद करणार आहे. कॉग्निझंट ही टेक कंपनी अमेरिकेमधील कंपनी आहे. मात्र तिचे भारतामध्ये देखील या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणात आहे. कॉग्निझंट ही काही पहिली कंपनी नाही की जीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. Wipro, Amazon, Accenture, Infosys, IBM, Google, Meta आणि Twitter यांसारख्या कंपन्यांनीही गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Cognizant कंपनीचे नवनियुक्त सीईओ रवी कुमार एस यांच्या समोर सध्या कंपनी बदळण्याचे आणि Accenture, TCS आणि Infosys सारख्या उद्योगातील दिग्गज टेक कंपन्यांशी स्पर्धा करण्याचे कठीण टास्क असणार आहे. कॉग्निझंट कंपनीने दरवर्षीच्या नफ्यात ३ टक्के किरकोळ वाढ नोंदवली आहे. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू देखील ४.८१ अब्ज डॉलर झाला आहे. तसेच कॉग्निझंटचे मार्जिन हे सध्या १४.०६ टक्के आहे. जे टेक महिंद्राच्या बरोबर आहे.