फुड डिलिव्हरी कंपन्यांमुळे हॉटेलचे अन्न घरीच मिळत असल्याने अनेक लोक या सेवेचा लाभ घेतात. मात्र, काही कंपन्यांकडून उशिरा डिलिव्हरी होत असल्याच्या तक्रारी देखील लोकांकडून होतात. झोमॅटो ही कंपनी फुड डिलिव्हरी क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, एका चुकीमुळे कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. कंपनी ऑर्डर पुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने तिला ग्राहकाला ८ हजार ३६२ रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

केरळातील एका विद्यार्थ्याने झोमॅटोवर अन्न पदार्थ ऑर्डर केले होते, त्याला ऑर्डर मिळाले नाही आणि रिफंडही मिळाले नाही. आपण त्याच रात्री दोन विविध ऑर्डर केले, परंतु हे ऑर्डर देखील मिळाले नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत विद्यार्थ्याने तक्रार केली होती. केरळमधील ग्राहक न्यायालयाने याप्रकरणी झोमॅटोला भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत.

(डेटा संरक्षण विधेयकात सुधारणा; ‘ही’ चूक केल्यास कंपन्यांना द्यावा लागेल तब्बल २०० कोटी रुपयांपर्यंतचा दंड)

बार आणि बेंचच्या अहवालानुसार, झोमॅटो ३६२ रुपये किंमतीचे अन्न पदार्थ वितरीत करण्यास अयशस्वी झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याने कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग कोल्लमनुसार, तक्रारदाराला व्याजासह ३६२ रुपये मिळण्याचा अधिकार होता. न्यायालयाने कृष्णनला त्याच्या मानसिक त्रासाठी भरपाई म्हणून ५ हजार आणि कार्यवाहीच्या खर्चासाठी ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

(विंडोजचे नवीन व्हर्जन अपडेट करू नका, अन्यथा ‘या’ समस्यांना द्यावे लागेल तोंड)

दरम्यान या प्रकरणावर झोमॅटोनेही आपली भूमिका मांडली असून, अन्न पदार्थाचे ऑर्डर घेण्यासाठी कृष्णन उपलब्ध नव्हता, असे झोमॅटोचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, कृष्णनच्या पत्त्यासंबंधी काही समस्या होती आणि त्यास झोमॅटो अ‍ॅपवर पत्ता दुरुस्त करण्याचे सांगण्यात आले होते, असा दावा झोमॅटोने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर रेस्टॉरेंटच्या मालकाशी आपण बोललो होतो. झोमॅटो गर्दीच्या वेळी किंवा पावसाच्या हंगामात अशाप्रकराच्या अनुचित पद्धती अवलंबत असल्याचे त्याने सांगितल्याचे कृष्णन याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे कृष्णनने रिफंड, १.५ लाखांची भरपाई आणि न्यायालयीन कामकाजाचा खर्च म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली होती. सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर कोलम जिल्हा न्यायालयाने झोमॅटोला कृष्णन यास ८ हजार ३६२ रुपये भरपाईचे आदेश दिले.