देशभरामध्ये सर्वत्र मेट्रोचे काम सुरू आहे. महत्वाच्या शहरांमध्ये काही ठिकाणी मेट्रो सुरू देखील झाली आहे. आता प्रवाशांची सोय व्हावी म्हणून दिल्ली मेट्रोने क्यूआर कोडची सुविधा सुरू केली आहे. प्रवासी आता सर्व मार्गांवर QR कोड आधारित पेपर तिकीट खरेदी करू शकतात. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने याची माहिती दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, DMRC विद्यमान टोकन आधारित प्रणाली टप्प्याटप्प्याने बंद करेल. सध्या प्रवासी स्टेशनवरील काउंटरवरून टोकन आणि क्यूआर कोडवर आधारित कागदी तिकिटे खरेदी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथापि Qr कोड असलेले तिकीटाचा वापर करून प्रवासी मधल्याच कोणत्याही स्टेशनमधून बाहेर उतरू शकत नाहीत. त्यांनी ज्या स्टेशनचे तिकीट काढले आहे त्याच स्टेशनवर प्रवाशांना बाहेर जाता येईल. समजा तुम्हाला एखाद्या मधल्याच स्टेशनवरून बाहेर जायचे असल्यास काउंटरवर असेलया कर्मचाऱ्याकडून मोफत पासचे तिकीट घ्यावे लागणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क अकरले जाणार नाही आहे. DMRC ने प्रत्येक स्टेशनवर QR कोडच्या तिकिटांसाठी 2 AFC (Automatic Fair Collection) बसवले आहे.

हेही वाचा : टाटा, अंबानी आणि एलॉन मस्क यांचा जिम लूक व्हायरल; अभिनेत्यांना लाजवतील हे अंदाज, काय आहे नेमके प्रकरण?

DMRC लवकरच मोबाईलवर आधारित QR तिकीट सिस्टीम आणणार आहे. DMRC च्या मते मेट्रोमधील प्रवास अधिक आरामदायी आणि सोपा व वेळेची बचत करणारा आहे. कारण यामुळे स्टेशन/काउंटरवर प्रत्यक्ष तिकीट खरेदी करण्याची गरज नाहीशी होईल.

दिल्ली मेट्रोमध्ये QR तिकीट कसे वापरावे ?

१. ज्या स्टेशनमधून तुम्ही QR आधारित तिकीट (नॉन रिफंडेबल) घेतले आहे तिजहून तुम्ही तुमचा प्रवास सुरु करू शकता.

२. तुम्ही दुसऱ्या स्थानकावरून QR आधारित तिकीट काढण्याचा आणि दुसऱ्या स्थानकावरून प्रवास सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तसे करू शकणार नाही.

३. क्यूआर तिकीट जनरेट झाल्यानंतर प्रवाशांना ६० मिनिटांच्या आतमध्ये आपला प्रवास सुरु करावा लागणार आहे.

४. तसे न केल्यास तुमचे तिकीट रद्द होईल व त्याचा रिफंडदेखील परत मिळणार नाही.

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केला ११९ रुपयांचा स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…

५. एका स्टेशन वरून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठीच प्रवाशांना तिकिटे दिली जात आहेत.

६. प्रवाशांनी ज्या स्टेशनचे तिकटी घेतले आहे , त्यांना तिथेच उतरावे लागणार आहे. जर का तुम्ही त्याआधीच कुठे उतरला तर AFC गेट उघडणार नाहीत.

QR तिकीटाची फोटो कॉपी किंवा फोटो मान्य केला जाणार नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi metro launch qr code paper tickets check how to use new ticket sytem tmb 01
First published on: 09-05-2023 at 17:55 IST