इंटरनेटमुळे आर्थिक व्यवहार करणं आता फारच सोपं झालं आहे. आपण घरबसल्या बँक अकाउंटमधले पैसे काढू शकतो, कोणाच्याही अकाउंटवर पैसे पाठवू शकतो, पण या वाढत्या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत. तसेच काही तोटे सुद्धा आहेत. गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वेगाने वाढत आहे. हॅकर्सनी केवळ कॉल आणि मेसेजद्वारेच नव्हे तर ओटीपी आणि फिशिंग लिंकद्वारेही लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच अशी फसवणूकीची घटना समोर आली आहे.

३७ लाख खात्यातून गायब

गुजरातमधील मेहसाणा येथे राहणाऱ्या दुष्यंत पटेल यांच्यासोबत जे घडले ते अतिशय धक्कादायक आहे. दुष्यंतने कोणताही ओटीपी कोणाशीही शेअर केला नाही किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही, तरीही ३० मिनिटांत त्याच्या खात्यातून ३७ लाख रुपये चोरीला गेले.

डेव्हलपर म्हणून काम करणार्‍या दुष्यंत पटेल यांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्यात त्यांनी सांगितले की ३० मिनिटांत त्यांच्या खात्यातून ३७ लाख रुपये चोरीला गेले. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने कोणाशीही माहिती शेअर केलेली नाही. ३१ डिसेंबरला पटेल ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना बँकेतून पैसे कापल्याचा संदेश सतत येत होता. दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या खात्यातून १० लाख रुपये काढण्याचा मेसेज आला. त्यानंतर दुपारी ३.२० वाजता आणखी १० लाख रुपये काढण्याचा मेसेज आला.

हे ही वाचा << 5,000 Mah बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह Poco लाँच करणार ‘हा’ दमदार स्मार्टफोन; पाहा काय आहे खास

तत्काळ बँकेत जाऊन तक्रार

सततच्या व्यवहाराच्या मेसेजनंतर दुष्यंत पटेल यांनी तात्काळ बँक गाठून अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि खाते बंद करण्यास सांगितले. मात्र, बँकेतच तक्रार करत असतानाच ३:४९ वाजता त्यांच्या खात्यातून १७ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला. त्याच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या खात्यात प्रवेश करू शकत नव्हता आणि त्याचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड अवैध सांगत होते.

पोलीस तपास सुरु

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दुष्यंतचा स्मार्टफोन हॅक करून हॅकर्सनी बँक खात्याची माहिती चोरली असावी आणि त्यानंतर ही घटना घडवून आणली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा << …म्हणून नवीन वर्षात वापरता येणार नाही 5G सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वत:ला सुरक्षित ठेवा

जर तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर चुकूनही कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका. जर कोणी तुम्हाला कॉल करून OTP मागितला किंवा तुम्हाला एखादे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले तर ते अजिबात डाउनलोड करू नका. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि तुमच्या खात्यातून पैसेही चोरीला जाऊ शकतात. नेहमी सतर्क रहा. सुरक्षित रहा.