आजच्या युगात सोशल मीडिया जगातील सर्वात जलद संप्रेषणाचे साधन बनले आहे. सोशल मीडियाची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचा उपयोग प्रत्येक वयातील लोक करीत आहेत. परंतु ज्या पद्धतीने नाण्याच्या दोन बाजू असतात त्याच पद्धतीने सोशल मीडियाचे एकीकडे सकारात्मक फायदे तर आहेत परंतु दुसरीकडे यांचे भयंकर दुष्परिणाम देखील होत आहेत.

लोक या व्यासपीठाचा वापर जास्तीत जास्त संवाद साधण्यासाठी करत आहेत. एसएमएस पाठवण्याबरोबरच लोक व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल व्हिडीओ देखील पाठवतात. पण आता लोकांनी विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ पाठवण्यापूर्वी काळजी घ्यावी, अन्यथा ते महागात पडू शकते. तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

गर्भपाताचा व्हिडीओ कोणाला पाठवू नका

भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. गर्भपात करताना पकडल्यास रुग्णावर तसेच रुग्णालयावर कारवाई केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकून गर्भपाताचा व्हिडीओ घरी कोणाला पाठवला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तसेच गर्भपाताचे स्वदेशी फॉर्म्युला सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करू नका. तुम्हीही गर्भपाताचे औषध घेत असल्याचा व्हिडीओ पाठवलात तर पोलिस  तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट १९७१ नुसार गर्भपात हा गुन्हा मानला जातो. कायद्यात गर्भपात करणाऱ्यांना तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

(हे ही वाचा : खूशखबर! व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर्स; वापरकर्त्यांसाठी ठरणार पर्वणीच, काय आहे खास जाणून घ्या )

अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा व्हिडीओ शेअर करु नका

चाइल्ड पॉर्न व्हिडीओ देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येतो. पोस्को कायदा २०१२ अंतर्गत बाल पोर्नोग्राफी भारतात गुन्हा म्हणून ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलात तर तुम्ही कायदेशीर गुन्हेगार झाला आहात. तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. अशा परिस्थितीत चुकूनही अल्पवयीन व्यक्तीचा अश्लील व्हिडीओ शेअर करू नका. भारतात लहान मुलाचा व्हिडीओ, फोटो शेअर करणे किंवा बनवणे हा पोस्को कायद्याच्या कलम १४ अंतर्गत गुन्ह्याच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आला आहे.

ऑनलाइन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देऊ नका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुम्हाला प्रमाणित स्टॉक मार्केटचे ज्ञान नसेल तर तुम्ही कोणालाही ऑनलाइन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देऊ नये. तसेच, इनसाइडर ट्रेडिंग करू नये, कारण असे करणे सेबीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्या विरोधात कोणी तक्रार केली किंवा सेबीच्या तपासात तुम्ही दोषी आढळले तर तुम्हाला दंडासह तुरुंगात जावे लागू शकते.