Smartphone: आपण ज्याच्यापासून आता एक मिनिटही दूर राहू शकत नाही, अशी प्रिय वस्तू म्हणजे आपला स्मार्टफोन. जवळ स्मार्टफोन नसला की जीव कासावीस होऊन जातो. लोकांना सध्या मनोरंजन आणि काही ऑफिशियल कामं ही स्मार्टफोनवरून करायला आवडत आहे. मात्र, हा आपला जिवलग मित्र आपला जीवही घेऊ शकतो. स्मार्टफोनचा हा चूकीचा वापर आपल्या जीवावर बेतू शकते. स्मार्टफोन जास्त गरम होऊन त्याचा स्फोट होणे किंवा आग लागण्यासारख्या मोठ्या दुर्घटना घडू शकतात. त्यामुळं त्याची वेळोवेळी काळजी कशी घ्यायची याबाबत आज समजून घेऊया.

स्मार्टफोन ‘ओव्हरहीट’ का होतो ?

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?

जगातील सर्व इ-डिवाइस गरम होतात. असे एकही डिवाइस नाही जे गरम होत नाहीत. ज्याप्रमाणे टीव्ही, फ्रीज, पंखा, इत्यादी इलेक्टॉनिक्स वस्तू गरम होतात त्याचप्रमाणे मोबाईल देखील गरम होतो. मात्र, त्याचा चूकीचा वापर हा देखील एक महत्वाचे कारण असू शकते. त्याचबरोबर खालील कारणे सांगता येईल.

१. जास्त वेळ व्हिडीओ शूट करणे.

२. ब्राइटनेस वाढवून व्हिडीओ पाहणे.

३. स्मार्टफोनमध्ये जून्या आणि आऊटडेटेड अ‍ॅप्स असणे.

४. मोबाईलमध्ये सॉफ्टवेयर अपडेट्सचा प्रॉब्लेम असणे.

५. दुसऱ्या चार्जरवरून मोबाईल चार्ज करणे.

६. जास्त वेळ मोबाईलचा हॉट्सस्पॉट सुरू असणे.

आणखी वाचा : BSNL Recharge Plan: Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan!

कडक उन्हापासून होतो ओव्हरहीट

स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे दुसरे कारण म्हणजे उन्हामुळे फोन खूप गरम होणे. यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये दाब वाढतो. दरम्यान, तुम्ही स्मार्टफोन वापरत असताना, प्रोसेसरच्या उष्णतेमुळे स्मार्टफोन आणखी गरम होते आणि त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. तुमच्या सोबत स्मार्टफोनच्या स्फोटाची समस्या घडू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्मार्टफोन उघड्यावर उन्हात ठेवू नका. स्मार्टफोन ओव्हरहिटींग आपल्यासाठी मोठी अडचण निर्माण करू शकते.

बराच वेळ स्मार्टफोन खिशात ठेवणे पडेल महागात

स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे मुख्य कारण म्हणजे फोन खूप गरम होणे. मोबाईल प्रमाणापेक्षा जास्त गरम झाल्यास बॅटरीचा दाब वाढून स्मार्टफोनचा स्फोट होतो. खिशात स्मार्टफोनचा स्फोट होऊन एखादा व्यक्ती जखमी झाल्याची बातमी आपण ऐकलीच असेल. कारण, स्मार्टफोन तासनतास खिशात ठेवला तरी तो खूप गरम होतो. काही लोक बॅगेत सामानासोबत स्मार्टफोन ठेवतात. यामुळे स्मार्टफोन अधिक गरम होतो. असे केल्याने मोबाईलची बॅटरी गरम होत दाब वाढून स्मार्टफोनचा स्फोट होतो.