Sam Altman on ChatGPT: एआयचा वापर आता सर्रासपणे वाढला आहे. कृषी क्षेत्रातही आता एआय वापरले जाणार आहे. दैनंदिन कामाच्या निमित्ताने अनेकजण एआय वापरण्याला प्राधान्य देतात. त्यातही चॅटजीपीटी आल्यापासून एआयचा चेहरामोहरा बदलला. पण ज्यांनी चॅटजीपीटीची निर्मिती केली. तेच आता यावर डोळेझाक करून विश्वास ठेवू नका, असे सांगत आहेत. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की, चॅटजीपीटीवर डोळेझाक करून विश्वास ठेवू नका. एआय प्रभावी असले तरी ते वारंवार चुका करत असते, अशी कबुलिच त्यांनी दिली.

ओपनएआयने सुरू केलेल्या अधिकृत पॉडकास्टवर बोलताना, ऑल्टमन यांनी इंटरनेट वापरकर्त्यांना एआय टूलवर अधिक विसंबून राहण्यापासून सावध केले आहे.

सॅम ऑल्टमन म्हणाले, “चॅटजीपीटीवर लोकांचा जास्त विश्वास आहे. हे मनोरंजक असले तरी लोकांनी अशा तंत्रज्ञानावर विसंबून राहणे योग्य नाही.” तंत्रज्ञ अँड्र्यू मेने यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ऑल्टमन यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत भाष्य केले आहे.

ऑल्टमन यांनी लार्ज लँग्वेज मॉडेल्सच्या (LLMs) मर्यादांबद्दलही माहिती दिली. हे टुल्स भ्रम पसरविणारी किंवा चुकीची माहिती निर्माण करू शकतात. इंटरनेट वापरकर्ते इतर तंत्रज्ञानाबाबत जसे चोखंदळ असतात, त्याचप्रमाणे त्यांनी याही टुल्सकडे पाहावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅटजीपीटी आणि इतर पारंपरिक वेब सर्च किंवा सोशल मीडियाशी तुलना होत असल्याबाबत ऑल्टमन म्हणाले की, इतर प्लॅटफॉर्म जाहिरातदारांच्या फायद्यासाठी वापरकर्त्यांचा अनुभव बदलण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जाहिरातींचा भाग नाहीत, हे आता ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला दिसत असलेला कटेंट हा जाहिरातींवर आधारित आहे की तुमच्या आवडीचा? असा प्रश्न वापरकर्त्यांनी उपस्थित करायला हवा.