Dyson air purifying headphones launch : डायसनने आनोखा हेडफोन सादर केला आहे. कंपनीने Dyson air purifier headphone सादर केले असून तो मार्च २०२३ मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या हेडफोनची किंमत ७८ हजार रुपये असेल. हेडफोनचे डिजाइन अनोखे आहे. या वायरलेस हेडफोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलिंग फीचरसह पोर्टेबल एअर प्युरिफिकेशन सिस्टिम मिळते. मनोरंजनासह आरोग्यही चांगले राहावे, प्रदूषणापासून आरोग्याला धोका होऊ नये, या दृष्टीकोनातून हे हेडफोन तयार केल्याचे दिसते.

किंमत

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

या हेडफोनची किंमत ७८ हजार रुपये असेल आणि तो मार्च २०२३ पासून केवळ अमेरिकेत प्रि ऑर्डर अपॉइंटमेंटद्वारे उपलब्ध होईल. डायसन नंतर कंपनीच्या वेबसाइटवर आणि डायसन डेमो स्टोअरमधील इन स्टोअरमध्ये हेडफोन खरेदीसाठी उपलब्ध करून देईल. प्रदेशानुसार किंमत बदलू शकते. भारतात हे हेडफोन कधी लाँच होणार याची माहिती नाही.

(एका चार्जवर ७ दिवस चालणार, ब्लूटूथ कॉलिंगसह लाँच झाली COLORFIT LOOP SMARTWATCH, किंमत केवळ..)

फीचर्स

हेडफोनमध्ये एअर फिल्टरेशन सिस्टिम आहे आणि एक वेगळा करता येणारा वायसर आहे जो तोंडाकडे आणि नाकाकडे शुद्ध हवा फेकतो. गरज नसल्यास वायसर हटवता येते आणि हेडफोन इतर वायरलेस हेडफोन सारखे वापरता येते.

हेडफोनमधील वायू शुद्धीकरण प्रणाली एअर टाइट सील देत नाही, त्यामुळे हा मास्कला पर्याय नाही किंवा हवेतील विषाणू आणि जिवाणूंविरुद्ध पुरेसे संरक्षण देईल याची शक्यता कमी आहे. परंतु, हा हेडफोन 0.1 मायक्रॉन इतके लहान कण आणि शहराच्या प्रदूषणाशी संबंधित आम्लयुक्त वायूंविरोधात उपयुक्त ठरतो.

(META LAYOFFS: ६ वर्षीय चिमुकलीच्या प्रतिक्रियेची इंटरनेटवर चर्चा, आईची नोकरी गेल्यावर म्हणाली “तू अजूनही..”)

ऑडिओ क्षमतांबाबत बोलायचे झाल्यास हेडफोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन फीचर मिळते. हेडफोनमध्ये ६-२१००० हर्ट्झची फ्रिक्वेंसी रेसपॉन्स रेंज मिळते. त्याचबरोबर, हेडफोनमध्ये हँड फ्री कॉलिंग, अ‍ॅप बेस्ड इक्यू कस्टमायझेशन आणि इतर फीचर मिळतात.