‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेेतली आहे.एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काहींना काही बदल सातत्याने मस्क करत आहेत. आता त्यांनी अजून एक प्रयोग करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपले पब्लिक अकाउंटला प्रायव्हेट अकाउंटमध्ये बदलले आहे.
असा प्रयोग करून एलॉन मस्कला जाणून घ्यायचे आहे की , प्रायव्हेट अकाउंट्समधील ट्विट्स सुद्धा सार्वजनिक अकाउंटमध्ये दिसतात का ? यासाठी त्यांनी आपले ट्विटर अकाउंट प्रायव्हेट केले असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. उद्या सकाळपर्यंत मास्क यांचे अकाउंट प्रायव्हेट करण्यात आले आहे. यातून त्यांना जाणून घ्यायचे आहे की वापरकर्ते पब्लिक ट्विट्स पेक्षा जास्त त्यांचे प्रायव्हेट ट्विट पाहू शकतात की नाही. ज्याने हे मस्क यांचे ट्विट त्याच्या फिडमध्ये पाहिले त्यांनी ते खूप आनंदी असल्याचे सांगितले.
हेही वाचा : ट्वीटरला पुन्हा दणका! मार्केटिंग कंपनीचे पैसे भरले नाहीत, एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ
तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की , जर तुम्ही ट्विट्स बघू शकत आहेत तर तुम्ही विश्वासाच्या वर्तुळात आहात. अनेक वापरकर्त्यानॆ याबाबतचे स्क्रीनशॉट्स शहेअर केले आहेत. एलॉन मस्क हे काय करत आहेत हे त्यांना माहिती आहे असे एका वापरकर्त्याने लिहिले आहे. ४४ अब्ज रुपयांच्या खरेदीनंतर ट्विटर कंपनीच्या अनेक धोरणांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
एलॉन मस्क यांनी त्यांचे अकाउंट प्रायव्हेट केल्यामुळे त्यांच्यावर टीका देखील होत आहे. त्यांनी कंपनीचे काम देखील कमी केले आहे. याशिवाय त्यांनी वापरकर्त्यांसाठी ब्ल्यू सब्स्क्रिप्शन सर्व्हिस सुद्धा सुरू केली आहे.