scorecardresearch

ट्वीटरला पुन्हा दणका! मार्केटिंग कंपनीचे पैसे भरले नाहीत, एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ

….म्हणून ट्वीटर कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ झालीय.

ट्वीटरला पुन्हा दणका! मार्केटिंग कंपनीचे पैसे भरले नाहीत, एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ
एलॉन मस्क यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Image-Twitter)

Elon Musk Latest News : ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ एलॉन मस्क यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका मार्केटिंग फर्मने ट्विटर कंपनीविरोधात खटला दाखल केल्याने एकच खळबळ उडालीय. सॅन फ्रान्सिस्को येथील एका कार्यालयाच्या भाड्याचे पैसे न दिल्याने ट्विटर कंपनीवर यापूर्वीही खटला दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ट्विटरला मोठा दणका बसला आहे. कारण सॅन फ्रान्सिस्को येथील कॅनरी मार्केटिंग फर्मने ट्विटर कंपनीवर त्यांचे शुल्क न भरल्याचा आरोप केला आहे. या कंपनीने ट्विटरवर जवळपास ३.१९ कोटी रुपयांसह व्याजाचे पैसे थकवल्याचा आरोपाखाली खटला दाखल केल्याचं समजते.

ट्वीटर कंपनी आणि कॅनरी कंपनीत मोठा करार झाला होता, नेमकं प्रकरण काय आहे?

बिझीनेस इनसायडरने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने या मार्केटिंग फर्मच्या कराराचे उल्लंघन केल्याने तसेच शुल्क न भरल्याने ६ जानेवारीला ट्विटरविरोधात खटला दाखल करण्यात आला. दिग्गज मार्केटिंग एजन्सी असलेल्या कॅनरा मार्केटिंग फर्मने ट्विटरव कायदेशीर कारवाई करण्यसाठी पावलं उचलली आहेत. ही मार्केटिंग फर्म गुगल, स्लॅक, केएफसी आणि सेफोरा या कंपनींसाठी कॅम्पेन आणि पॅकेजेस डिझाईन करतात, अशी माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

नक्की वाचा – कुठल्याही प्रकारच्या शारिरीक संपर्कास बंदी; शाळेच्या फतव्यावरून नाराजी

खटल्यात नमूद असलेल्या माहितीनुसार, जून २०२० ते ऑगस्ट २०२२ पर्यंत कॅनरी मार्केटिंग फर्म ट्विटर कंपनीला व्यापारासंबंधातील मालाचा पुरवठा करत होती. ट्विटर आणि या कंपनीत झालेल्या करारानुसार ६० दिवसांच्या आत ट्विटरने कॅनरी फर्मला शुल्क देणं अपेक्षित होतं. परंतु, दोन टप्प्यातील पेमेंट ट्विटरकडून आला नसल्याचा दावा या कपंनीने केला आहे. खरंतर, एप्रिल २०२२ मध्ये ट्विटरवर बोली लावण्यता आली. त्यानंतर मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आली. मात्र, या कंपनीसोबत अधिकृत करार ऑक्टोबर २०२२ ला करण्यात आला होता. त्यामुळे कॅनरा मार्केटिंग फर्मसोबतचे जास्तीत जास्त व्यवहार त्यावेळी ट्विटर कंपनीत असणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 22:07 IST

संबंधित बातम्या