मेटाने शुक्रवारी जवळपास १० लाख फेसबूक वापरकर्त्यांना काही अ‍ॅप्सबद्दल सावध केले आहे. या धोकादायक स्मार्टफोन अ‍ॅप्सना युजरचे पासवर्ड चोरण्यासाठी बनवण्यात आले असून, जवळपास १० लाख यूजर या अ‍ॅपच्या संपर्कात आले असल्याची माहिती मेटाने दिली आहे.

मेटाने अशा ४०० पेक्षा अधिक अ‍ॅप्सची ओळख पटवली आहे. हे अ‍ॅप्स अँड्रॉईड आणि अ‍ॅपल स्मार्टफोनसाठी बनवलेली आहेत, अशी माहिती मेटाचे थ्रेट डिसरप्शनचे संचालक डेविड अग्रावोनिच यांनी दिली. लोकांनी हे धोकादायक अ‍ॅप्स डाउनलोड करावे यासाठी ते फोटो एडिटिंग, गेम, व्हिपिएन सेवा, व्यवसाय अ‍ॅप आणि युटिलिटी अ‍ॅप म्हणून उपलब्ध होते.

(Twitter Update : आता शब्दांना फोटो, व्हिडिओ, जीआयएफ या तिघांची एकाचवेळी लाभणार साथ, जाणून घ्या ट्विटरचे नवे फीचर)

हे अ‍ॅप्स त्यांचे फीचर वापरू देण्यासाठी लॉगिन करताना युजरला फेसबुक खात्याची माहिती मागायचे आणि माहिती टाकल्यावर युजरनेम आणि पासवर्ड चोरी करायचे, असे मेटाच्या सुरक्षा पथकाचे म्हणणे आहे. १० लाख यूजर या अ‍ॅप्सच्या संपर्कात आले असतील. त्यांना याबाबत आम्ही माहिती देऊ, असे मेटाने म्हटले आहे.

आढळलेल्या अ‍ॅप्समधील जवळपास ४० टक्के अ‍ॅप्स हे फोटो एडिट करण्याशी संबंधित होते. असे अ‍ॅप्स बनवणारे केवळ फेसबुकचे पासवर्डच नव्हे, तर इतर सेवांचे पासवर्ड हाती मिळवण्याच्या प्रयत्नात असू शकतात, अशी शक्यता मेटाने वर्तवली आहे. याबाबत अ‍ॅपल आणि गुगलशी बोलणे झाले आहे, असे मेटाचे म्हणणे आहे.

(लाँच पूर्वीच ONE PLUS BUD PRO 2 चे फीचर लिक, वायरलेस चार्जिंगसह ‘हे’ फीचर देणार स्पष्ट आवाज, जाणून घ्या..)

दरम्यान मेटाला आढळलेल्या धोकादाक अ‍ॅप्सपैकी अनेक अ‍ॅप्स त्याच्या वेटिंग सिस्टिमने प्लेस्टोअरमधून काढून टाकल्याचे, गुगलने सांगितले आहे. देशात हॅकिंगच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. ऑनलाईन माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक देखील होत आहे. त्यामुळे, सोशल मीडिया किंवा ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे.