सध्या सोशल मीडिया हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. सर्व जग सध्या सोशल मीडियाद्वारे एकमेकांना जोडलं गेलं आहे. मात्र, नुकतेच मेटा मालकीच्या फेसबुकने खात्याबाबत मोठा खुलासा केला असून फेसबुकने १,६०० बनावट फेसबुक खाती बंद केली आहे.

फेसबुक खाती बंद करण्याचे कारण

सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की, युक्रेनबद्दल रशियन  प्रचार प्रसारित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या १,६०० बनावट फेसबुक खात्यांचे मोठे नेटवर्क काढून टाकले. यापैकी डझनभर सोशल मीडिया खाती आणि वेबसाइट्स रशियन प्रचाराला  चालना देत होती आणि युक्रेन आक्रमणाबद्दल चुकीची माहिती पसरवत होती. आम्ही तुम्हाला सांगूया की याआधीही, देशविरोधी बनावट बातम्या पसरवल्याबद्दल मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया वेबसाइट्सने ६० हून अधिक सोशल मीडिया खाती ब्लॉक केली होती.

आणखी वाचा : आता स्मार्टफोनसाठी ‘हे’ अ‍ॅप बंधनकारक; केंद्र सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत

या कारवाईत ६० हून अधिक बनावट वेबसाइट्सचाही समावेश  

फेसबुकचे म्हणणे आहे की मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांनी हे बनावट ऑपरेशन शोधले आणि संबंधित खाती काढून टाकली. युनायटेड किंगडममधील द गार्डियन वृत्तपत्र आणि जर्मनीतील डेर स्पीगल यांसारख्या वेबसाइट्सची कॉपी करून तयार करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये ६० हून अधिक बनावट वेबसाइट्सचाही सहभाग असल्याचा दावा फेसबुकने केला आहे. ही वेबसाइट रशियाचा प्रचार करत होती आणि युक्रेनबद्दल खोट्या बातम्या पसरवत होती.

भारतातही घालण्यात आली होती बनावट खात्यांवर बंदी

गेल्या महिन्यातच, भारत सरकारने दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल युट्यूब चॅनेल, अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली होती. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खात्यांवर देशात आण्विक स्फोटापासून उत्तर कोरियाकडून अयोध्येत सैन्य पाठवण्यापर्यंतची खोटी माहिती पसरवली जात होती. या बंदी घातलेल्या खाती आणि युट्यूब चॅनेलमध्ये लाखो व्ह्यूज असलेले सात भारतीय आणि एक पाकिस्तानी युट्यूब चॅनल समाविष्ट आहे.