फेसबुक कंपनीने आपली एक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकवरील ‘नेबरहूड्स’ नावाचे फिचर लवकरच कालबाह्य होणार आहे. एक ऑक्टोबरपासून हे फिचर बंद करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या फिचर्सच्या माध्यमातून एकाच परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या कारणांसाठी कनेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

‘नेबरहूड्स’ला लॉन्च करण्याचा हेतू हा स्थानिक कम्युनिटीला एकत्र आणण्याचा होता. मात्र, ठराविक आवड किंवा एखाद्या परिसरात राहणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी फेसबुकवरील ग्रुप्स हा पर्याय अधिक चांगलं माध्यम असल्याचं कंपनीच्या लक्षात आलं. यासाठी कंपनीने काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन ग्रुप्सच्या माध्यमातूनच ठराविक प्रदेशात राहणारे लोक एकमेकांच्या संपर्कात राहतील, असा प्लॅटफॉर्म ग्रुप्सवरच उपलब्ध करुन दिला. त्यामुळेच ‘नेबरहूड्स’ला बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

(Iphone 13 स्वस्तात मिळू शकतो, जाणून घ्या एका क्लिकवर)

पुढील महिन्यात हे फिचर्स लोकांना वापरता येणार नाही. हे तांत्रिक दृष्ट्या सांगायचं झाल्यास एक हायपरलोकल फिचर्स आहे. या फिचर्सची सेवा टप्प्याटप्प्यात बंद केली जात असून. पहिल्यांदा कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे फिचर बंद करण्यात आले आहे.  कंपनी सध्या खर्च मर्यादित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळेच ‘नेबरहूड्स’ बंद केल्याचा कंपनीला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘नेबरहूड्स’ बंद केल्याने कंपनीच्या भागधारकांना विषेश तोटाही होणार नाही. त्यामुळेच कंपनी हे फिचर्स बंद करणार आहे.