Fire Boltt Gladiator Smartwatch : नवीन वर्षाकरिता गिफ्ट द्यायचे असेल किंवा स्वत:साठी तुम्ही स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. इंडियन ब्रँड फायर बोल्टने नवीन स्मार्टवॉच Fire Boltt Gladiator लाँच केली आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.९६ इंचचा डिस्प्ले मिळतो. या स्मार्टवॉचमध्ये आणखी कोणते फीचर्स मिळतात? आणि त्यांची किंमत काय? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स

Fire Boltt Gladiator स्मार्टवॉचला अल्ट्रा नॅरो फ्रेम डिजाइन मिळाले आहे. घड्याळाला आयपी ६७ रेटिंग मिळाले असून ते पाण्यापासून बचावाची खात्री देते. घड्याळ डस्ट आणि क्रॅक रेझिस्टेंट असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग फीचर, स्पीकर, माइक्रोफोन, १२४ स्पोर्ट्स मोड, जीपीएस सपोर्टेड मोड जसे जीपीएस रनिंग, जीपीएस वॉकिंग, जीपीएस सायकलिंग, जीपीएस ऑन फूट आणि जीपीएस ट्रेल मिळते. ही घड्याळ हार्ट रेट मॉनिटरसह मिळते. यासह महिलांसाठी खास हेल्थ मॉनिटरिंग फीचर आणि स्लीप मॉनिटरिंग फीचर देखील मिळते.

(जुन्या ‘Apple iphone’चे आयुष्य वाढवू शकता, फॉलो करा ‘या’ ३ ट्रिक्स)

घड्याळात ७ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते आणि ती २० दिवस स्टँडबाय मोडवर राहू शकते, असा कंपनीचा दावा आहे. ब्लूटूथ कॉलिंग अक्टिव्हेट असताना वॉच दोन दिवसांची बॅटरी लाइफ देते. केवळ १० मिनिटांच्या चार्जिंगने हे घड्याळ २४ तास चालते असा कंपनीचा दावा आहे. हे घड्याळ ब्लॅक, ब्ल्यू, गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या शिवाय या घड्याळात कॅलक्युलेटर अ‍ॅप, वेदर अ‍ॅप आणि अलार्म अ‍ॅपदेखील मिळते.

किंमत

या घड्याळाची किंमत २ हजार ४९९ रुपये असून ते अमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. ३० डिसेंबरपासून या घड्याळाची विक्री सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire boltt gladiator smartwatch launch in india check price and features ssb
First published on: 27-12-2022 at 18:29 IST