नव्या वर्षातील मोठा सेल लवकरच सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल कधी सुरू होणार याची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते, आता याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल ६ जानेवारी ते ८ जानेवारी असणार आहे. या सेलमध्ये फ्री डिलीवरी, इजी रिटर्न, लो प्राईज या सुविधांसह कोणत्या प्रोडक्ट्सवर मोठी सुट जाहीर करण्यात आली आहे जाणून घ्या.
सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मिळणार मोठी सुट
किचन अप्लायन्सेस, कुकवेअरवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. बेस्ट सेलिंग लॅपटॉपवर ४० टक्क्यांची सुट उपलब्ध होणार आहे. याशिवाय हेडफोन, स्पीकर ३९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये विकत घेता येईल.
आणखी वाचा: मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? जाणून घ्या यामागचे कारण
सेलमध्ये टीव्ही वर मोठी सुट देण्यात येणार आहे. स्मार्ट टीव्ही ७,४९९ रूपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये विकत घेऊ शकता. फ्रिजवर देखील ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध होणार आहे. तर वॉशिंग मशीनवर ६० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध होणार आहे. मोबाईलवर किती डिस्काउंट उपलब्ध होणार आहे, याबाबत अजुन वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली नाही. याची माहिती लवकरच उपलब्ध होईल.