scorecardresearch

मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? जाणून घ्या यामागचे कारण

मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजुलाच का असतात जाणून घ्या

मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो? जाणून घ्या यामागचे कारण
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मोबाईल आपल्या आयुष्यात इतर जीवनावश्यक गोष्टींप्रमाणे महत्त्वाचा झाला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण अगदी सकाळी उठल्यापासून ते मध्यरात्री झोपेपर्यंत सतत मोबाईल पाहण्याचे अनेकांना जणू व्यसन लागले आहे. काही काम नसतानाही सतत मोबाईल पाहण्याची सर्वांना सवय लागली आहे. पण सतत आपल्या हातात असणाऱ्या या उपकरणाबद्दल बऱ्याच गोष्टीं आपल्याला माहित नसतात. त्यातीलच एक म्हणजे मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला का असतो?

मोबाईलचा कॅमेरा हा नेहमी डाव्या बाजूलाच असतो, यामागे एक काय कारण असते? कदाचित हा डिझाईनचा भाग असेल का? डाव्या बाजूला कॅमेरा असल्याने फोटोमध्ये काही फरक पडतो का? असे अनेक प्रश्न याबाबत आपल्याला पडतात. यामागे नेमके काय कारण आहे जाणून घ्या.

आणखी वाचा: ‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणाऱ्या आवाजामागील चेहरा; जाणून घ्या कशी झाली निवड

बरेचजण मोबाईल डाव्या हातात पकडतात. त्यामुळे डाव्या बाजूला असणाऱ्या कॅमेऱ्यामुळे फोटो आणि व्हिडीओ शूट करणे सहज शक्य होते. तसेच मोबाईल आडवा करून लँडस्केप मोडवरून शूट केले जाते, तेव्हा कॅमेरा वरच्या बाजूला येतो आणि लँडस्केप शूट व्यवस्थित करता येते. त्यामुळे बहुतांश सर्व मोबाईलमध्ये कॅमेरा डाव्या बाजूला असतो.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 20:06 IST

संबंधित बातम्या