Flipkart Big Saving Days Sale Start Today : मनोरंजनासाठी विविध साधने उपलब्ध असली तरीही आपल्यातील अनेकांना टीव्हीवर मालिका, चित्रपट, कार्टून बघायला खूप आवडते. पण, तुमचा टीव्ही खराब झाला असेल किंवा तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) आजपासून सुरू झाला आहे. त्यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्ससह विविध उत्पादनांवर अविश्वसनीय सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी थॉमसन आणि ब्लाउपंकट या दोन कंपन्यांनी स्मार्ट टीव्हीवरील त्यांच्या ऑफर्सबद्दल माहिती सांगितली आहे. दोन्ही ब्रॅण्ड विविध स्क्रीन आकारांमध्ये परवडणारे पर्याय ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत. २० ते २५ डिसेंबर २०२४ दरम्यान हा सेल सुरू राहील. या सेलमध्ये पाच हजार ९९९ रुपयांपासून ते ६९ हजार ९९९ रुपयांपर्यंतचे टीव्ही तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

सहा हजारांत खरेदी करा स्मार्ट टीव्ही (Flipkart Big Saving Days Sale)

फ्लिपकार्ट सेलदरम्यान (Flipkart Big Saving Days Sale) ब्लाउपंकट (Blaupunkt चा) ’24Sigma707 स्मार्ट टीव्ही’ फक्त पाच हजार ९९९ रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. म्हणजेच मूळ किंमत ६ हजार ४९९ पेक्षा कमी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ५०० रुपयांची सवलत दिली जाईल. त्याचप्रमाणे थॉमसन ’24अल्फा001 स्मार्ट टीव्ही’ पाच हजार ९९९ रुपये या किमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. मूळ किंमत सहा हजार ४९९ पेक्षा ही किंमत कमी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ५०० रुपयांची सवलत दिली जाईल.

Muramba
एकीकडे अक्षय माहीचे कौतुक करणार तर दुसरीकडे साई रमाला प्रपोज करणार; पाहा ‘मुरांबा’ मालिकेत काय घडणार?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Junaid khan and Khushi Kapoor starr rom-com Loveyapa box office collection day 2
जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाच्या चित्रपटाची चांगलीच टक्कर, जाणून घ्या दुसऱ्या दिवशीची कमाई
Six year old Girl in just one minute did 100 pushups
‘तरुणांनो, तुम्हाला जमेल का?’ सहा वर्षांच्या चिमुकलीने फक्त एका मिनिटात मारले १०० पुशअप्स; VIDEO पाहून व्हाल शॉक
Shocking video of kid babbling in sleep due to mobile addiction how to get rid of mobile parents must watch viral video
पालकांनो आपल्या मुलांना मोबाइलपासून दूरच ठेवा! लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Jugad for home safety tips to protect house from thieves and fraud video goes viral
VIDEO: घरात चोरी होऊ नये म्हणून तरुणानं शोधला भन्नाट जुगाड; एकही रुपया खर्च न करता आधी हे काम करा, घरात कधीच चोरी होणार नाही
Shocking video of little boy making pushpa style reel after car accident video viral on social media
बापरे! कारचा चक्काचूर, कुटुंब मृत्यूच्या दारात अन् चिमुकला बनवतोय रील; VIDEO पाहून बसेल धक्का
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘

हेही वाचा…एकच व्हॉट्सॲप नंबर दोन फोनमध्ये वापरणे शक्य आहे का? मग समजून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

४ के स्मार्ट टीव्ही –

ब्लाउपंकट (Blaupunkt) २२ हजार ४९९ पासून सुरू होणारा 4K स्मार्ट टीव्ही ऑफर करत आहे. हे मॉडेल Android TV ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते आणि UHD रिझोल्युशनसह ४३ इंचांचा डिस्प्लेदेखील दिला आहे. हे Dolby Atmos, Dolby Vision व DTS TruSurround सारख्या ऑडिओ आणि व्हिज्युअल तंत्रज्ञानदेखील सपोर्ट करते.

कंपनीच्या ५० इंचांच्या 4K स्मार्ट टीव्हीची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे; तर ५५ इंचांचा टीव्ही ३१ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. जर तुम्हाला यापेक्षा जास्त मोठी स्क्रीन पाहिजे असेल,तर ६५ इंचांचा टीव्ही तुम्हाला ४३ हजार ९९९ रुपयांना आणि ७५ इंच टीव्ही तुम्ही ७२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात.

दुसरीकडे थॉमसनच्या २० हजार ४९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या 4K स्मार्ट टीव्हीच्या लाइनअपमध्ये ४३, ५०, ५५, ६५ व ७५ इंच आदी पर्याय ग्राहकांना देण्यात येत आहेत. तुमच्यासमोर आकारानुसार टीव्हीच्या विविध मॉडेल्सचे पर्याय उपलब्ध असतील. त्यामध्ये २७ हजार ९९९ रुपयांमध्ये ५० इंच, ३० हजार ९९९ रुपयांमध्ये ५५ इंच, ४४ हजार ९९९ रुपयांमध्ये ६५ इंच व ६९ हजार ९९९ रुपयांमध्ये ७५ इंच अशा पर्यायांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कंपनी 4K मॉडेलच्या प्रत्येक खरेदीवर 25W साउंड बारसह त्याच्या स्मार्ट टीव्हीवर २० हजार रुपयांपर्यंतची सवलतसुद्धा देत आहे.

Story img Loader