Flipkart ही एक ई-कॉमर्स साईट आहे. यावरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टींची खरेदी करू शकता. तसेच ऑनलाईन स्वरूपात वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर डिस्काउंट देखील मिळतो. या साईट्स आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स किंवा सेल आणत असतात. असाच एक सेल फ्लिपकार्ट घेऊन आले आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Flipkart ने Big Saving Days Sale ची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा हा सेल ११ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. म्हणजेच होळीच्या नंतरदेखील तुम्हाला स्मार्टफोन्स आणि इतर प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळू शकणार आहे. फ्लिपकार्टच्या हा सेल १५ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्ज डे सेलसाठी कोणत्या बँकेने सपोर्ट केला आहे ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा : NASA News: २०४६ च्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला पृथ्वीवर आदळणार Asteroid, नासाने दिला इशारा

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलसाठी एक स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे, जेणेकरून सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑफर्स कळू शकतील. सेलमध्ये iPhone 14 नाही तर iPhone 14 Plus वर देखील बंपर डिस्काउंट मिळणार आहे. सध्या कोणत्या डिव्हाइसवर किती डिस्काउंट मिळणार आहे कळू शकले नसले तरी ऑफर्स नंतर त्यांची किंमत ही ७०,००० रुपयांपेक्षा कमी असणार आहे.

फ्लिपकार्टने शेअर केलेल्या टीझरनुसार Google Pixel 6a ची किंमत २८,९९९ रुपये असून सेलमध्ये तुम्हाला २६,९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो. याच्या खरेदीवर ICICI बँकेच्या कार्ड्स आणि EMI व्यवहारांवर १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Nothing कंपनीचा Nothing Phone (1) हा पहिला फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये डिस्काउंटसह विकला जाणार आहे. मात्र डिस्काउंटनंतर हा तुम्ही किती किंमतीमध्ये खरेदी करू शकता हे अद्याप कळलेले नाही. मात्र फ्लिपकार्टच्या पेजवरून हे स्पष्ट झाले की , हा फोन ३० हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.