इन्स्टाग्राम (Instagram) या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी नवनवीन फिचर जोडले जातात. त्यातच आता रील्ससाठी एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीमधील फोटोंवर स्टिकर जोडता येते हे आपल्याला माहित असेलच. पण आता रील्सवर देखील स्टिकर जोडता येणार आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या नव्या फिचरची घोषणा केली आहे. हे नवे फिचर कसे वापरायचे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबूक आणि इन्स्टाग्राम या मेटा अंतर्गत येणाऱ्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे स्टिकर्सचे नवे फिचर वापरता येणार आहे. फेसबूक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते रील्समध्ये आता आवडते स्टिकर्स जोडू शकतील. तसेच या नव्या फीचरमधून रील बनवणाऱ्या व्यक्तीला रील पाहणाऱ्या प्रेक्षकांनी एखाद्या विशिष्ट वेबपेजवर जावे असे जर वाटत असेल, तर त्याचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच रीलमध्ये असे एक स्टिकर्स जोडण्यात येईल ज्याद्वारे क्रियेटर्स प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वेब पेजवर घेऊन जाऊ शकतील.

आणखी वाचा – मोबाईलमधला इंटरनेट डेटा लगेच संपतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा नक्की होईल बचत

इन्स्टाग्राम रील्समध्ये स्टिकर्स जोडण्याच्या स्टेप्स

  • सर्वात आधी इन्स्टाग्रामवर रील रेकॉर्ड करा किंवा आधी केलेला एखादा व्हिडीओ फोन गॅलरीमधून अपलोड करा.
  • व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर स्टिकर पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर स्टिकर पेज दिसेल.
  • यानंतर ॲड युअर स्टिकर (Add Yout Sticker) हा पर्याय निवडा, त्यामध्ये तुम्हाला कोणता स्टिकर हवा आहे त्याचे नाव लिहा.
  • स्टिकरवर क्लिक केल्यानंतर रीलमध्ये स्टिकर जोडले गेल्याचे दिसेल. आता तुम्ही रील पब्लिश करू शकता.

इन्स्टाग्राम वापरकर्ते आपल्या स्टिकर्ससोबत स्वतःचा वेगळा फॉन्ट, कलर, प्रॉम्प्ट वापरून रील अधिक आकर्षक करू शकतात. तसेच या स्टिकरमध्ये ‘ॲड युअर्स’ हे फिचर देखील उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहचू शकता. म्हणजेच तुम्ही जर एखाद्या रीलमध्ये ‘ॲड युअर्स’ स्टिकर जोडले, तर तिथे इतरांना देखील त्यांचे फोटो अपलोड करता येऊ शकतील.

आणखी वाचा – कोणी गुपचूप तुमचा कॉल रेकॉर्ड करतय का? ‘या’ ट्रिक्स वापरून लगेच ओळखा

स्टिकरचे नवे फिचर चुकीची माहिती पसरवणाऱ्या, इन्स्टाग्राम गाईडलाईन्सचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सना वापरता येणार नाही. याची माहिती इन्स्टाग्रामने दिली आहे. काही अकाउंट वरून सतत समाजात तेढ निर्माण होईल असा आशय प्रसिद्ध करण्यात येतो. अशा आशय प्रसिद्ध होण्यापासून रोखण्यासाठी इन्स्टाग्राम प्रयत्न करत आहे. तसेच या नव्या फिचरसह आता इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर रिल्स क्रॉस पोस्ट करता येणार आहेत. याची माहिती इन्स्टाग्राम सीइओ एडम मोसेरी यांनी दिली.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these steps to add stickers in instagram reels pns
First published on: 20-08-2022 at 12:11 IST