WhatsApp New Feature: व्हॉटसअ‍ॅपने संवाद साधणे, मीडिया फाईल शेअर करणे अगदी सोपे केले आहे. कॉल, व्हिडीओ कॉल, मीडिया फाईल शेअर करणे अशा अनेक सुविधा व्हॉटसअ‍ॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपकडुन युजर्स
साठी सतत नवनवे फीचर्स लाँच केले जातात. असेच एक नवे फीचर सध्या चर्चेत आहे, जे सध्या फक्त काही युजर्ससाठी उपलब्ध आहे.

व्हॉटसअ‍ॅपवर कोणताही मेसेज, फोटो, व्हिडीओ सहज फॉरवर्ड करता येतो, हे सर्वांनाच माहित असेल. पण आता नव्या फीचरचा वापर करून युजर्सना त्याबरोबर असणारा टेक्स्ट मेसेजही फॉरवर्ड करता येणार आहे. याआधी तुम्ही फाईल फॉरवर्ड करताना, त्याबरोबर असणारा टेक्स्ट फॉरवर्ड केला जात नसे, फक्त मिडीया फाईल्स फॉरवर्ड होत असत. यात आता टेक्स्ट मेसेजही फॉरवर्ड करता येणार आहे.

आणखी वाचा- SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉइड युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध झाले आहे. या फीचरचा वापर करून युजर्सना कोणताही कंटेन्ट फॉरवर्ड करताना त्याबरोबर असणारा टेक्स्ट मेसेजही फॉरवर्ड कॅप्शन स्वरुपात शेअर करता येणार आहे. या कॅप्शन फीचरमुळे, तो कीवर्ड टाकून चॅटमधुन ते शोधणे सहज शक्य होईल.