‘टीडब्लू इलेक्ट्रॉनिक्स’ या युनायटेड किंगडममधील कंपनीने एक नवा रिमोट सादर केला आहे. या नव्या रिमोटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या रीमोटमध्ये वेगळी बॅटरी टाकण्याची गरज नाही, कारण हा रिमोट स्वतःच चार्ज होणार आहे. या रिमोटच्या तळाला फोटोवोल्टेक पॅनल असेल, ज्यामुळे हा रिमोट स्वतःच चार्जिंग करू शकेल.

‘टीडब्लू इलेक्ट्रॉनिक्स’ ने ट्विटद्वारे या रिमोटबाबत माहिती दिली आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या लाईटद्वारे हा रिमोट चार्ज होणार आहे. हा रिमोट गुगल टीव्हीसाठी वापरण्यासाठी तयार असल्याची माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

आणखी वाचा: WhatsApp वर टेक्स्टसह फॉरवर्ड करता येणार फाईल्स; जाणून घ्या कोणाला वापरता येणार नवे फीचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘9to5 Google’ नुसार रिमोटमध्ये असणारे पॅनल उपलब्ध असणाऱ्या लाईटचा वापर करून ऊर्जा तयार करते, या ऊर्जेचा वापर करून त्यामध्ये विजेची निर्मिती होऊन रिमोट आपोआप चार्ज होतो. हा रिमोट गुगल टीव्ही प्रोडक्टसह लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सॅमसंग कडुन असा सेल्फ चार्जिंग रीमोट लाँच करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनकडुनही लवकरच असा रीमोट लाँच केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.