गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी “Mrwhosetheboss” या नावाने ओळखले जाणारे लोकप्रिय YouTuber अरुण मैनी यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या आहेत. यामध्ये पिचाई यांनी AI चे भविष्य आणि स्मार्टफोनवरील त्याचा परिणाम याबद्दल स्पष्टपणे चर्चा केली आहे.

सुंदर पिचाई यांनी AI लोकशाहीकरणावर भर देताना सांगितले, ” तुम्ही आता एआय जगातील सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करत आहात. ही गोष्ट चांगली असली तरीही गोष्टी फार जलद गतीने घडत आहेत असे मला वाटते. एआयशी जुळवून घेता यावे यासाठी लोकांना वेळ द्यावा लागेल. प्रगती करण्यासाठी समाजामध्ये होणाऱ्या बदलांबाबतचे आव्हान मानवासमोर आहे.” याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.

हेही वाचा : ऑनलाईन ऑर्डरमध्येही ‘हापूस’ने मारली बाजी, ‘या’ अ‍ॅपवर भारतीयांनी एप्रिलमध्ये मागवले तब्बल २५ कोटींचे आंबे

AI मध्ये वेगाने होणाऱ्या प्रगतीमध्ये संतुलन राखण्यासाठी असणाऱ्या गरजांवर त्यांनी टिप्पणी केली आहे. याशिवाय, सुंदर पिचाई यांनी टेक क्षेत्रामध्ये उत्साही असणाऱ्या लोकांमध्ये आणखी एका प्रश्नाला संबोधित केले. सीईओ सुंदर पिचाई हे स्वतः नाविन्यपूर्ण असलेला पिक्सल फोल्ड वापरतात का ? असा तो प्रश्न होता. यावर बोलताना पिचाई यांनी हे स्पष्ट केले त्यांनी विस्तृतपणे पिक्सल फोल्डची चाचणी केली डिव्हाइसशी त्यांची ओळख असल्याचे मान्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुंदर पिचाई आणि अरुण मैनी यांची YouTube मुलाखत तीन दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आली आहे. आतापर्यन्त ही मुलाखत २.८ मिलियन लोकांनी पहिली आहे. मुलाखत पाहिल्यावर एका व्यक्तीने त्यांची मुलाखत पाहिल्यावर आनंद व्यक्त केला. तसेच सुंदर पिचाई यांच्या नम्रपणाची प्रशंसा देखील केली.