Google Layoffs CEO Sundar Pichai: सध्या जगभरात दिग्गज टेक कंपन्यांसह विविध क्षेत्रातील कंपन्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच Google या दिग्गज टेक कंपनीने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. पुन्हा एकदा Google ने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुगलच्या भारतातील युनिट्समधून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे.

गुगलने आपल्या भारताच्या युनिटमधील ४५३ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या बिझनेसलाईनच्या अहवालानुसार या ४५३ भारतीय कमर्चाऱ्यांना (Google indian Employee layoff) काढून टाकण्याची कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली आणि याची माहिती मेलद्वारे देण्यात आली. हा मेल गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी पाठवला आहे.गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची सहमतीही या मेलमध्ये नमूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : RBI कडून ‘इतक्या’ अ‍ॅग्रीगेटर्सना Online Payment साठी काम करण्याची तत्वतः परवानगी, जाणून घ्या कोणाकोणाचा आहे समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहवालानुसार, अनेक कारणांमुळे कमर्चाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असून, सुंदर पिचाई यांनी या सर्व निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे.या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पाठवलेल्या मेमो मध्ये त्यांनी दावा केला होता की, गुगलचे यूएसच्या बाहेरील Google कमर्चाऱ्यांना स्थानिक नियमांनुसार स्थानिक पद्धतींनुसार समर्थन मिळेल. google ने भारतातील ४५३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र जागतिक स्तरावर किती कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे किंवा कंपनीने मध्ये अजून कमर्चारी कपात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.