नुकताच Google चा I/O इव्हेंट पार पडला. यामध्ये गुगलने अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत. त्यामध्ये कंपनीने आपला Google Pixel 7a लॉन्च केला आहे. हा फोन भारतामध्ये देखील लॉन्च झाला आहे. हा फोन Pixel 6a चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. Pixel 7a चे डिझाईन हे Pixel 7 आणि Pixel 7 Pro सारखेच आहे. Pixel 7a आणि Pixel 7 याच्या किंमतीमध्ये आणि फीचर्समध्ये फार फरक दिसून येत नाही. आज आपण या दोन्हींमधील कोणता फोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pixel 7a आणि Pixel 7 चे स्पेसिफिकेशन्स

Pixel 7a या फोनमध्ये अँड्रॉइड १३ येते. तसेच या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले आणि ९० Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. तर Pixel 7 मध्ये सुद्धा अँड्रॉइड १३ मिळते. त्याशिवाय ६.३२ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेटसुद्धा ९०Hz इतका आहे. गुगलच्या या दोन्ही फोनमध्ये Tensor G2 या प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इतके इंटर्नल स्टोरेज मिळते.

हेही वाचा : आता IPL २०२३ चा अधिक आनंद लुटता येणार; Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि…

Pixel 7a आणि Pixel 7 चा कॅमेरा

Pixel 7a आणि Pixel 7 या दोन्ही फोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. Pixel 7a मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा येतो ज्यामध्ये OIS सिस्टीम येते. तर दुसरी लेन्स ही १३ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड आहे. कम्र्यामध्ये ४के व्हिडीओसह ६० FPS वर रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. तर गुगलच्या Pixel 7 मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच दुसरी लेन्स ही १३ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आहे. पिक्सल ७ ए या फोनमध्ये सेलीफीसाठी १३ तर पिक्सल ७ मध्ये १०.८ मेगापिक्सलचा कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे.

Google Pixel 7a vs Pixel 7 ची बॅटरी

Google Pixel 7a मध्ये 128 जीबीचे UFS 3.1 स्टोरेज मिळते. तथापि Pixel 7 मध्ये २५६ जीबीचे स्टोरेज मिळते. दोन्ही फोनमध्ये ५जी चा सपोर्ट देण्यात आला आहे. सेफ्टीसाठी दोन्ही फोनमध्ये तुम्हाला फेस अनलॉकसह इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण देण्यात आला आहे. Pixel 7a यामध्ये ४३८५ mAh तर Pixel 7 ४३५५ mAh ची बॅटरी मिळते. दोन्ही फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.

हेही वाचा : भारतात लॉन्च झालेल्या Google Pixel 7a वर मिळतोय ४ हजार रुपयांचा डिस्काउंट, HDR सपोर्टसह मिळणार…

Google Pixel 7a vs Pixel 7 ची किंमत

Google Pixel 7a ची किंमत ही ४३,९९९ रुपये इतकी आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. हा फोन तुम्ही Charcoal, Snow आणि Sea Colors या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. ११ मेपासून Flipkart वर याची विक्री सुरू झाली आहे.  Pixel 7 हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून ५६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. हा फोन तुम्ही Snow, Obsidian आणि Lemongrass या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pixel 7a v google pixel 7 camparison battery camera and processor more check features price tmb 01
First published on: 14-05-2023 at 09:09 IST