Google Features: युजर्सना अधिकाधिक चांगली सेवा मिळावी हाच नेहमी Google चा प्रयत्न असतो. युजर्सना कोणत्या फीचर्सचा अधिक फायदा होईल आणि त्यांचे काम अधिक सोपे होईल याकडे देखील कंपनी विशेष लक्ष देते. अशात टेक जायंट सर्च इंजिन गुगलने भन्नाट फीचर्स आणले आहे. या नवीन फीचरचा गुगल युजर्सना उत्तम युजर अनुभव मिळणार असून आता व्हॉट्सअॅपप्रमाणेच तुम्ही गुगल मेसेजवर इमोजीद्वारे प्रतिक्रिया देऊ शकणार आहात. असे या अॅपच्या एका नवीन फीचरची चाचणी करताना दिसून आले. म्हणजेच अलीकडे व्हॉट्सअॅपमध्ये असे एक फीचर अॅड करण्यात आले होते, ज्यानंतर तुम्ही एखाद्याने पाठवलेल्या मेसेजवर इमोजी रिअॅक्शन पाठवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय असेल खास?

गुगल आपल्या अॅपवर सतत अनेक नवीन फीचर्स जोडत आहे. सध्या ते डीफॉल्ट अँड्रॉइड मेसेजिंग अॅप म्हणजेच गुगल मेसेज सुधारण्यात गुंतले आहेत. कंपनी या अॅपवर नवीन फीचर्ससह अनेक गोष्टी जोडत आहे. गुगलने नुकतेच हे अॅप अपडेट केले असून, मेसेजिंग अॅपचे नवीन आयकॉनमध्ये बदल केला आहे. हे फीचर सध्या लेटेस्ट गुगल मेसेजेस बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहे. अशी अपेक्षा आहे की, कंपनी लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी रिलीज करेल. जाणून घेऊया नवीन अपडेटमध्ये कोण-कोणते फीचर देण्यात आले आहे.

(आणखी वाचा : Best Recharge Plan: मस्तच! ३९५ रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घ्या; तीन महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध )

कोणत्याही मेसेजवर प्रतिक्रिया देता येणार

मागील रिपोर्ट्सनुसार, गुगलच्या या फीचरमध्ये यूजर्सला फक्त सात इमोजीचा पर्याय मिळत होता. आता अनेक इमोजीचा यात पर्याय देण्यात येत आहे. तसेच, कोणत्याही संदेशावर प्रतिक्रिया पाठवण्यासाठी, तुम्हाला हा संदेश बराच वेळ दाबावा लागेल. यानंतर, तुमच्यासमोर अनेक इमोजी पर्याय दिसतील, ज्यामधून तुम्ही तुमच्या आवडीचा पर्याय निवडू शकता. यासह, तुम्हाला + चे चिन्ह देखील दिसेल, ज्याच्या मदतीने तुम्ही त्यात एक नवीन इमोजी जोडू शकता. हे फीचर व्हॉट्सअॅपच्या मेसेज रिअॅक्शन फीचरसारखेच आहे आणि त्याच पद्धतीने काम करते.

तुम्हाला Google च्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर संदेश शेड्यूल करण्याचा पर्याय देखील मिळेल. यासाठी कोणताही मेसेज टाईप केल्यानंतर सेंड बटण दाबून ठेवावे लागेल.

यानंतर, तुम्हाला मेसेज पाठवण्यासाठी तीन डिफॉल्ट पर्याय मिळतील. याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःनुसार वेळ आणि तारीख सेट करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google recently updated the app changing the messaging app to a new icon this feature will work like whatsapp pdb
First published on: 27-11-2022 at 13:37 IST