नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने एक मोठी घोषणा केली आहे. एचएमडी कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून नोकिया ब्रॅण्डला काढून टाकले आहे. आता एचएमडी ग्लोबल कंपनी स्वतःचे एचएमडी ब्रॅण्डचे प्रॉडक्ट लाँच करणार आहे. कंपनी खूप दिवसांपासून या डिव्हाइसवर काम करीत आहे.

एचएमडी लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) २०२४ मध्ये लाँच करण्यात येईल. आता या ब्रॅण्डचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स Nokia.com वर नाही. तर HMD.com वर तुम्हाला पाहायला मिळतील.

नोकिया स्मार्टफोन्स बाजारात मिळणार की नाही ?

ही बातमी आल्यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आला की, आता नोकियाचे स्मार्टफोन्स बाजारात मिळणार की नाही. तर याआधीसुद्धा मायक्रोसॉफ्ट कंपनी नोकियाचे फोन्स बनवायची. पण, काही दिवसांनी नोकिया ब्रॅण्डचे राईट्स एचएमडी ग्लोबलकडे सोपवण्यात आले. नोकिया कंपनीची नवीन वेबसाइट HMD.com येथे तुम्हाला नोकियाच्या स्मार्टफोन्सची लिस्ट मिळणार आहे.

हेही वाचा…१० हजारपेक्षा कमी किमतीत Motorola चा नवीन स्मार्टफोन लाँच ! विक्रीला ‘या’ तारखेपासून सुरुवात; पाहा जबरदस्त फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच एचएमडी कंपनीने एक्स (ट्विटर)वर एक टीजर पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतःचे ह्युमन मोबाईल डिव्हाइस, असे वर्णन केले आहे. तसेच एचएमडी कंपनी जवळजवळ सात वर्षांपासून नोकिया कंपनीचे स्मार्टफोन्स बनवते आहे. २०१७ मध्ये कंपनीने याची सुरुवात केली होती; तर कंपनीने सोशल मीडिया अकाऊंटवरून नोकिया ब्रॅण्डला काढून टाकले आहे.