आधारकार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक अकाउंट पासून इतर महत्वाचे व्यवहार करताना आधार कार्डची गरज भासते. आधार कार्ड हे कोणत्याही ठिकाणी पत्त्याचा किंवा इतर गोष्टींचा पुरावा सादर करण्यासाठी विश्वासार्ह कागदपत्र मानले जाते. आपण अनेकदा आधार कार्डचे झेरॉक्स किंवा आधार कार्ड पुरावा म्हणून सादर करतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडे तुमच्या आधार कार्डची माहिती जमा होते. अशावेळी तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होऊ शकतो. किंवा तुमच्या आधार कार्डचा वापर करून कोणीही सिम कार्ड विकत घेऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध करण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल ‘डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशन’कडून (TAFCOP) लाँच करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्टेप्स वापरुन आधार कार्डवर किती सिम कार्ड्सची नोंद आहे जाणून घ्या

  • TAFCOP ची अधिकृत वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in उघडा
  • त्यांनंतर तिथे मोबाईल नंबर विचारण्यात आलेल्या पर्यायामध्ये तो देऊन OTP पाठवण्याचा पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मिळालेला OTP सेंड करा.
  • यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड्सची नोंद आहे, त्याची यादी दिसेल.

आणखी वाच : ‘ही’ ट्रिक वापरून पाहा गुपचूप Whatsapp Status; स्टेट्स ठेवणाऱ्या व्यक्तीलाही दिसणार नाही नाव

जर तुम्हाला या यादीत अनोळखी नंबर दिसला तर तो या यादीतून काढून टाकण्याचा पर्यायही उपलब्ध आहे, तसेच या अनोळखी क्रमांकाला रिपोर्टही करू शकता. यासाठी वेबसाईट वरील डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या चेक बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडरला संपर्क साधून याबाबत सुचना करावी लागेल. यानंतर तुम्ही हे सिम कार्ड रिपोर्ट करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many sim cards are registered on your aadhaar card check using these easy steps pns
First published on: 15-11-2022 at 19:06 IST