APPLE IPHONE 13 : अ‍ॅपल आयफोन १४ सिरीज लाँच झाल्यानंतर त्याखालील सिरीजमधील फोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. फ्लिपकार्ट, अमेझॉन या ई कॉमर्स कंपन्या आयफोन्सवर सूट देत आहेत. तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर बचतीसह तुम्ही तो खरेदी करू शकता. ६९ हजार ९०० रुपयांचा आयफोन १३ तुम्हाला ४८ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

फ्लिपकार्टवर अ‍ॅपल आयफोन १३ स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६९ हजार ९०० रुपये ठेवली आहे. मात्र, कंपनीने फोनवर ५ टक्के सूट दिल्याने फोनची किंमत ६५ हजार ९९९ रुपये झाली आहे. यासह तुम्ही या फोनवर मोठी बचत करू शकता.

(विमानतळाजवळ राहणाऱ्यांना उशिरा मिळू शकते 5G सेवा)

फोनवर १७ हजार ५०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. हा ऑफर तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असून या ऑफरमध्ये तुम्ही १७ हजार ५०० रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तुमचा फोन एक्सचेंज ऑफरच्या सर्व निकषांवर खरा उतरल्यास हा फोन तुम्हाला ४८ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.

अ‍ॅपल आयफोन १३ सूटसह अमेझॉनवरही उपलब्ध आहे. अमेझॉनच्या संकेतस्थळावर हा फोन ६५ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. या फोनवर १३ हजार ३५० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर देण्यात आला आहे. यातून तुम्हाला मोठी बचत होऊ शकते.

(CYBER FRAUD : नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर लूट, व्यापाराला १.२२ लाखांचा गंडा)

फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आयफोन १३ च्या फीचरबाबत बोलायचे झाले तर फोनमध्ये १२८ जीबीची स्टोरेज आहे. तसेच मागे १२ मेगापिक्सेलचे २ कॅमेरे असून सेल्फीसाठी देखील फोनच्या पुढील भागात १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये अडथळ्याशिवाय कार्य होण्यासाठी ए १५ बायोनिक चीप प्रोसेसर देण्यात आला आहे.