iPhone batterylife tips: जगभरात मोठ्या प्रमाणावर अ‍ॅपलच्या आयफोनचे चाहते आहेत. वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स, दमदार फीचर्स, काहीसा वेगळा लूक आदी कारणांमुळे आयफोन वापरणाऱ्या युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, फोनची बॅटरी झपाट्याने संपल्याने अनेक वेळा लोक चिंतेत देखील असतात. यामुळे फोन पुन्हा-पुन्हा चार्ज करावा लागतो. मात्र आता त्याची काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्या तुमच्या आयफोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी मदत करतील.

किती टक्के आयफोन चार्ज करावा –

तुम्ही तुमचा आयफोन १०० टक्के चार्ज करत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. शंभर टक्के चार्जिंगमुळे बॅटरी गरम होण्याची शक्यता असते. बॅटरी जास्त गरम झाल्यास त्याचा स्फोट होण्याचीही भीती असते. अशा अनेक घटना आपण वाचत असतो. यासाठी आयफोन ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करा. त्यामुळे बॅटरी जास्त वेळ टिकेल आणि कोणत नुकसानही होणार नाही. तसंच मोबाईल फोनची बॅटरी २० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर फोनचा वापर करु नका. फोनची बॅटरी खऱाब होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या आयफोनला नेहमी ओरिजनल चार्जरने चार्ज करा. जर तुम्ही दुसऱ्या किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर पडू शकतो. वारंवार अन्य चार्जरने फोन चार्ज केल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

लो पॉवर मोड –

तुम्ही आयफोन किंवा iPad च्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी लो पॉवर मोड सुरु करू शकता. असे केल्याने, फोनची इतर कामं किंवा Background Activities Disable केले जातात. ते करण्यासाठी, सेटिंग्जवर जा आणि बॅटरीवर क्लिक करा नंतर लो पॉवर मोड इनेबल करा.

स्क्रीन ब्राइटनेस –

खूप जास्त स्क्रीन ब्राइटनेस वापरण्याची अनेकांना सवय असते, पण यामुळेच तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. तुम्ही हे टाळले पाहिजे. ब्राइटनेस कमी करा किंवा ऑटो-ब्राइटनेस इनेबल करा. मुविंग वॉलपेपर बघायला चांगले वाटतात, मात्र त्यामुळे बॅटरी लवकर संपते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोन चार्जिंगला असताना कधीच वापरू नये.

ब्लूटूथ, वायफाय आणि एअरड्रॉप ऑन ठेऊ नका –

वायफाय सतत मोबाईलमध्ये ऑन असल्यामुळेही बॅटरी जलद संपते. वायफाय, ब्लूटूथसह, एअरपॉड चालू असताना ते सतत कनेक्शन शोधते. म्हणून, ते वापरात नसताना बंद करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – कीबोर्डच्या F आणि J बटणांवर छोट्या आडव्या रेषेसारखे चिन्ह का असते? जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राईज टु वेक बंद करा –

बॅटरी ड्रेन होण्यामागे राईज टु वेक हे फीचर देखील कारणीभूत असू शकते. हे मुख्यतः आयफोनवर डीफॉल्ट इनेबल असते. ते बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ‘आयओएस’ डिव्हाइसवरील सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही डिस्प्ले आणि ब्राइटनेस अंतर्गत नेव्हिगेट करू शकता.