आजकालच्या काळामध्ये आपण सर्वच जण मोबाइलचा वापर करतो. आपली अनेक कामे मोबाइलच्या मदतीने पूर्ण होतात. ऑनलाईन पेमेंट, काही वस्तूंची खरेदी अशा अनेक गोष्टी आपण फोनच्या मदतीने करतो. आपण फोन खरेदी करत असताना अनेक उचर्सची तुलना करून खरेदी करतो. तसेच तो खरेदी केल्यावर त्याची योग्यप्रकारे घेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का बॅटरी हा मोबाईलमधील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक आहे. कितीही जास्त किंमत असली किंवा जास्त फीचर्स असले तरी बॅटरीचा वापर जास्त होतो. तसेच प्रत्येक वापरकर्ता हा बॅटरीचे लाईफ चांगले राहण्यासाठी काळजी घेत असतो.

जर का एका तुमच्या फोनमधील बॅटरी खराब झाली तर ती दुरुस्त करण्याचा कोणताही उपाय नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे बॅटरीचे लाईफ कसे चांगले राहील यासाठी उपाययोजना करणे चांगले ठरू शकते. आज आपण स्मार्टफोनची बॅटरीचे लाईफ टिकवून ठेवण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Nothing Phone (2) की Infinix Hot 30 5G मध्ये कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? प्रत्येक पॉईंटबद्दल वाचा सविस्तर

८० टक्क्यांच्या वर चार्ज करू नये.

तुमचा स्मार्टफोन तुम्ही १०० टक्के चार्ज करत असाल तर असे करणे टाळावे. १०० टक्के चार्जिंग केल्याने बॅटरीवर ताण येतो. शक्यतो फोन हा ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करावा असे सांगितले जाते. काही स्मार्टफोन्स जसे नवीन आयफोन आणि Asus डिव्हाइसमध्ये बॅटरी ८० टक्के चार्ज झाली की ऑटोमॅटिक चार्जिंग बंद होण्याचा पर्याय असतो.

२० टक्क्यांच्या खाली फोन डिस्चार्ज करू नये

केवळ चार्जिंगच नव्हे तर तुमचा फोन जर का डिस्चार्ज होत असेल तरीसुद्धा तुमच्या फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. स्मार्टफोनच्या बॅटरीच्या चार्जिंगची सरासरी नियमित ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा चार्जिंग २० टक्क्यांवर येईल तेव्हा फोनचे चार्जिंग सुरू करा. मात्र वर सांगितल्याप्रमाणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होणार नाही काळजी घ्यावी.

कंपनीचा चार्जर वापरावा

नेहमी तुम्ही ज्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करता त्याच कंपनीचा चार्जर वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर का स्मार्टफोनसह चार्जर येत नसल्यास त्या कंपनीचा चार्जर मिळवावा. अधिकृत चार्जरमुळे फोन फास्ट चार्जिंग होईल आणि जेवढी गरज आहे तेवढीच पॉवर मोबाइलच्या बॅटरीपर्यंत पुरवेल.

हेही वाचा : तुमचाही आधार कार्डवरचा फोटो खराब आलाय? ‘असा’ करा अपडेट, फक्त एका मिनिटात होईल चकाचक

बॅटरी जास्त हिट होऊ देऊ नये

चार्जिंग दरम्यान बॅटरी जास्त हिट झाल्यास त्याचा देखील परिणाम बॅटरीवर होतो. तुम्ही गेमिंगसाठी तुमचा फोन वापरत असाल तर कूलिंग वाढवण्यासाठी एक्सटर्नल केस काढून टाका. तसेच फोन जास्तच गरम होत असल्यास तो थंड होईपर्यंत त्याचा वापर करणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॉफ्टवेअर अपडेट ठेवावे

चांगल्या बॅटरी लाईफचा आनंद घेण्यासाठी तुमचा स्मार्टफोन नवीन फर्मवेअरसह चालेल याची खात्री करा. अपडेट इन्स्टॉल करताना अपडेट प्रोसेससाठी तुमच्या फोनची बॅटरी ५५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल याची खात्री करावी.