काही दिवसांपुर्वी जगभरात व्हॉटसअ‍ॅप डाउन झाल्यानंतर मेसेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर अ‍ॅप्सची चर्चा सुरू झाली. व्हॉटसअ‍ॅपला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅप्सपैकी सर्वाधिक वापरले जाणारे एक अ‍ॅप म्हणजे टेलिग्राम. इतर मेसेजिंग अ‍ॅप्सशी असणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिग्रामवर लवकरच अनेक नवीन फीचर रोल आऊट करण्यात येणार आहेत. तसेच यावर आधीच उपलब्ध असणाऱ्या शेड्युल फीचरबाबत बऱ्याच जणांना माहिती नाही, जर तुम्ही टेलिग्राम कामानिमित्त वापरत असाल तर हे फीचर अत्यंत उपयुक्त आहे, या फीचरचा वापर करून तुम्ही मेसेज शेड्युल करू शकता. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

टेलिग्रामवर शेड्युल फीचर वापरण्याच्या सोप्या स्टेप्स :

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
  • टेलिग्राम अ‍ॅप उघडून, त्यातील ज्या ग्रुपवर किंवा वैयक्तिक चॅटवर मेसेज पाठवायचा आहे ते उघडा.
  • त्यानंतर जो मेसेज पाठवायचा आहे तो टाईप करा आणि सेंड बटनावर क्लिक करण्याऐवजी त्यावर लॉन्ग प्रेस म्हणजेच सेंड बटन प्रेस करुन ठेवा.
  • त्यावर दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यातील ‘शेड्युल मेसेज’ पर्याय निवडा.
  • त्यामध्ये पुढील ३० मिनिटांनी, २ तासांनी, ८ तासांनी यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.

Parental Supervision : मुलांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करेल हे फिचर; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

  • जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या दिवशी मेसेज पाठवायचा असेल तर त्याचाही पर्याय तिथे उपलब्ध होतो, यासाठी ‘डेट’ पर्यायामध्ये तुम्हाला हवी ती तारीख निवडुन, वेळ निवडा.
  • त्यानंतर निळ्या सेंड बटनावर क्लिक करा. तुम्ही पाठवलेला मेसेज निवडलेल्या दिवशी आणि त्या वेळेवर पाठवला जाईल.
  • या स्टेप्स वापरून तुम्हाला टेलिग्रामवर मेसेज शेड्युल करता येतील.