Whatsapp Message To Not Saved Contact : व्हॉट्सअ‍ॅप हे त्याच्या फिचरमुळे दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने अंडू फीचर सादर केले. या फीचरचा वापर केल्यास डिलीट झालेले मेसेज परत दिसून येतात, तसेच आता व्हिडिओ कॉलमध्ये ३२ व्यक्ती सहभाग घेऊ शकतात आणि ग्रुपमध्ये १ हजारांहून अधिक लोकांचा समावेश करता येतो. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करण्याव्यतिरिक्त इतर फीचर्स देत असल्याने त्याचे युजर्स वाढत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर सेव असलेल्या क्रमांकावर तुम्ही मेसेज पाठवू शकता हे तुम्हाला ठावूकच असेल, पण जो संपर्क क्रमांक तुमच्या स्मार्टफोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्येच नाही त्याला कसे व्हॉट्सअ‍ॅपने मॅसेज पाठवता येईल? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर आज आपण हे कसे शक्य होऊ शकते याबाबत जाणून घेऊया.

(WhatsApp New Feature: अँड्रॉइडवर शेअर करता येणार डेटा; काय आहे नवे फीचर जाणून घ्या)

जर कोणी तुम्हाला त्याचा संपर्क क्रमांक सेव्ह करण्यासाठी दिला असेल आणि तो तुम्ही सेव्ह करायचे विसरला असाल किंवा तुम्हाला तसे करायचेच नसेल तरी असे असताना तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. यासाठी मेटाचे अलीकडेच लाँच झालेले मेसेज युवरसेल्फ फीचरची आवश्यकता आहे. या फीचरद्वारे तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेव्ह नसलेल्या क्रमांकावर मेसेज पाठवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

(प्रवासाच्या आदल्या दिवशी मिळवा Train Ticket, ‘तत्काल तिकीट’ बूक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

  • ‘मेसेझ युअरसेल्फ’ चॅटवर टॅप करा आणि ज्या संपर्क क्रमांकावर तुम्हाला मेसेज करायचे हे तो संपर्क क्रमांक टाईप करा आणि स्वत:ला सेंड करा.
  • आता हा संपर्क क्रमांक तुम्हाला निळ्या रांगामध्ये दिसून येईल. संपर्क क्रमांकावर टॅप केल्यावर तुम्हाला ‘चॅट विथ फोन नंबर’, ‘कॉल ऑन व्हॉट्सअ‍ॅप’, ‘अ‍ॅड टू कॉन्टॅक्ट्स’ हे पर्याय दिसून येतील.
  • पहिले पर्याय निवडल्यावर एक चॅट विंडो उघडेल. या विंडोतून तुम्ही सेव्ह ने केलेल्या संपर्क क्रमांकावर मेसेज करू शकता.