भारतीयांसाठी महत्त्वाच्या ओळखीच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. आधार कार्डशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. आता एवढ्यात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून नागरिकांना सतत महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान, नुकतीच UIDAI ने एक नोटीसही जारी केली आहे.

UIDAI ने काय सुचविले?

आधार कार्ड दहा वर्षे जुने असल्यास ते अपडेट करण्याचा सल्ला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिला आहे. UIDAI ने आधार कार्ड धारकांना ओळख, पत्ता आणि इतर संबंधित कागदपत्रे अपडेट करण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा : आनंदाची बातमी: आता चेक बाऊन्सच्या प्रकरणांना बसेल चाप! लवकरच येतोय नवा नियम…

या पद्धतीने करा आधार कार्ड अपडेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अपडेट करता येते. आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला My Aadhaar पोर्टलवर जावे लागेल. दुसरीकडे, आधार कार्डधारक हे आधार केंद्राला भेट देऊन देखील आधार कार्ड अपडेट करू शकतात. यासाठी तुम्हाला काही शुल्कही भरावे लागू शकते.