मोबाइल फोन हा दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. आर्थिक व्यवहारापासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी मोबाइलचा वापर करण्यात येतो. तर अनेकदा फोन भिजणार नाही किंवा पाण्यात पडणार नाही याची आपण सतत काळजी घेत असतो. कारण – फोन पाण्यात पडला की तो खराब होण्याची शक्यता असते. जर तुमच्या मोबाइलमध्ये पाणी गेलं असेल किंवा तुमचा फोन पाण्यात पडला असेल, तर आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत, त्याचा उपयोग तुम्ही नक्की करून पाहू शकता. लोकसत्ता.कॉमच्या ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ या सीरिजमध्ये ‘Techy Marathi’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या धनंजय आणि प्रीती यांच्याशी इंटरव्ह्यूमध्ये गप्पा मारण्यात आल्या. तर त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये मोबाइल भिजल्यावर तो तांदळाच्या डब्यात ठेवायचा की नाही, याचे उत्तर देत एक खास टीप सांगितली आहे ती पाहू…
मोबाइल भिजला किंवा पाण्यात पडला तर तांदळाच्या डब्यात ठेवायचा की नाही?
तर धनंजय यांनी उत्तर देताना असे सांगितले की, तुम्ही मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवण्याऐवजी सिलिका जेल पॉकेटचा वापर करू शकता.
सिलिका जेल म्हणजे काय ?
तुम्ही एखादी नवीन बॉटल खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यात सिलिका जेल ही पुडी दिसेल. ही पुडी आपण निरुपयोगी म्हणून आपण अनेकदा फेकून देतो. पण, ही वस्तू खूपच उपयोगी आहे. तिला सिलिका जेल पॅकेट असेही म्हणतात. जर तुमच्या मोबाईलमध्ये पाणी गेलं तर सिलिका जेल पॉकेट त्यावर तुम्ही ठेवा.
कशाप्रकारे सिलिका जेल पॉकेटचा उपयोग करायचा ते पाहू…
१. सगळ्यात आधी फोन पुसून घ्या.
२. फोन आपटून अजिबात पाणी काढू नका. कारण मोबाइलच्या ज्या भागात पाणी नाही गेलं आहे तिथेसुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे.
३. तसेच तांदळाच्या डब्यात मोबाईल ठेवण्याऐवजी सिलिका जेल म्हणून एक छोटीशी पुडी येते तिचा वापर करा. हे सिलिका जेलचे पॉकेट तुम्ही गोळा करून एका डब्यात साठवून ठेवा.
४. या डब्यात तुमचा भिजलेला किंवा पाणी गेलेला मोबाइल ठेवा.
५. सिलिका जेलचे पॉकेट मोबाइलमधील पाणी जलद गतीने लगेच Observ करून घेते.तर तुम्ही मोबाइल पाण्यात पडला किंवा मोबाइलमध्ये पाणी गेलं तर ही सोपी पद्धत नक्की ट्राय करून बघू शकता.