प्रवासादरम्यान अनेक वस्तू आपण आठवणीने बॅगेत ठेवतो. त्यापैकी एक म्हणजेच मोबाईल किंवा लॅपटॉपचा चार्जर. कारण प्रवासात मोबाईलची बॅटरी लो झाली की, कोणाशीही संपर्क साधताना येत नाही व अनोख्या ठिकाणी पहिल्यांदा गेल्यावर तेथील अनेक गोष्टीची माहितीही गूगलद्वारे शोधता येत नाही. कारमधून प्रवास करताना मोबाईल युएसबी पोर्टमध्ये लावून चार्ज तर कार चार्जरच्या मदतीने मोबाईल चार्ज करु शकतो. पण, कारच्या प्रवासादरम्यान लॅपटॉप कसा चार्ज करावा, असा प्रश्न अनेकांच्या मनात फेर धरून नाचू लागतो. तसेच सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार सुद्धा लाँच झाल्या आहेत. या गाडयांना चार्ज सुद्धा करावे लागते. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉप केवळ एक तर इलेक्ट्रिक कार फक्त दहा मिनिटांत चार्ज होणार आहे.
भारतीय वंशाचे संशोधक अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने एक नवीन तंत्रज्ञान शोधले आहे ; जे लॅपटॉप, मोबाईल फक्त एका मिनिटांत तर दहा मिनिटांत इलेक्ट्रिक कार चार्ज करून देणार आहेत. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी शोधून काढले की, आयन नावाचे लहान आकाराचे कण, सूक्ष्म छिद्रांच्या नेटवर्कमध्ये कसे फिरतात. यूएस स्थित कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील रासायनिक आणि जैविक इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक अंकुर गुप्ता यांच्या मते या यशामुळे ‘सुपरकॅपेसिटर’ सारख्या अधिक प्रमाणात ऊर्जा साठवणाऱ्या उपकरणांचा विकास होऊ शकतो.
हेही वाचा…गूगल अकाउंटचा पासवर्ड सतत विसरता? आता चिंता सोडा, कुटुंबातील सदस्यांबरोबर करा बिनधास्त शेअर
अंकुर गुप्ता आणि त्यांच्या टीमने शोधलेलं हे तंत्रज्ञान केवळ वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ऊर्जा साठवण्यासाठीच नाही तर पॉवर ग्रिडसाठीही महत्त्वाचे आहे. जेथे चढ-उतार होणाऱ्या ऊर्जेचे जलद वितरण होते. अंकुर गुप्ता म्हणाले की, सुपरकॅपॅसिटर ; ऊर्जा साठवण उपकरणे त्यांच्या छिद्रांमध्ये आयन संग्रहावर अवलंबून असतात. तसेच यामध्ये बॅटरीच्या तुलनेत जलद चार्जिंग सपोर्ट आणि बॅटरी लाईफ जास्त असते ; त्यामुळे ॲपलचा कार प्रकल्प रद्द केल्यानंतर युएसमधील EV कंपनी Rivian बरोबर पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहे.
संशोधकांच्या मते, सुपरकॅपेसिटरचे प्राथमिक आकर्षण त्यांच्या गतीमध्ये असते. आयन हालचाली केवळ एका सरळ छिद्रात साहित्यात परिभाषित केल्या होत्या. हा शोध काही मिनिटांत हजारो परस्पर जोडलेल्या छिद्रांच्या नेटवर्कमध्ये आयन प्रवाह जलद करण्याची परवानगी देतो ; असे संशोधकांनी नमूद केले. त्यामुळे आता स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची चार्जिंग संपल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही किंवा इलेक्ट्रिक कारची चार्जिंग करण्याचे टेन्शन तुम्हाला येणार नाही.