सध्याच्या डिजिटल युगात घरबसल्या अनेक कामे करणे सोपे झाले आहे. जेव्हा आपण नवीन मोबाईल घेतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गूगल अकाउंट चालू करावे लागते आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड ठेवावा लागतो. त्यानंतर शॉपिंगपासून ते प्रवासापर्यंत आपण अनेक गोष्टींसाठी संबंधित ॲप्स डाउनलोड करतो. पण, या प्रत्येक ॲपमध्ये प्रवेश करताना आपल्याकडून गूगल अकाउंट लिंक करण्याची परवानगी घेतली जाते. त्यासाठी आपण अनेक ठिकाणी गूगलद्वारे साइन-अप करतो. पण, कधी कधी आपल्याला पासवर्ड आठवत नाही. हीच बाब लक्षात घेऊन, आता कंपनी एक नवीन फीचर आणत आहे.
‘सेफ्टी बिगिन्स ॲट होम’ (Safety begins at home) या म्हणीला गूगलने गांभीर्याने घेतलेले दिसत आहे. TheSpAndroid च्या ॲण्ड्रॉइड टिपस्टर AssembleDebug द्वारे दिलेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील गूगल अकाउंट होल्डर्स (युजर्स) पासवर्ड शेअरिंग करू शकणार आहेत. या फीचरवर सध्या कंपनी काम करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा…Xiaomi भारतात आणणार दोन सेल्फी कॅमेराचा स्मार्टफोन; ब्लॉग, रिल्ससाठी ठरेल फायदेशीर; फीचर्स पाहा
तुमचा पासवर्ड तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह शेअर करा –
या नवीन फीचरसह तुम्ही आता गूगल पासवर्ड मॅनेजरमध्ये तुमचे पासवर्ड तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर सुरक्षितपणे शेअर करू शकता. नवीन फीचरची घोषणा सुरक्षित इंटरनेट डेचा एक भाग म्हणून काही महत्त्वाच्या Family Link क्षमतांवर लक्ष केंद्रित करते. ॲण्ड्रॉइड प्राधिकरणाने अहवाल दिला आहे की, सध्या काही युजर्सना Google Play Services v24.20 सह मोबाइलवरील गूगल पासवर्ड मॅनेजरमध्ये पासवर्ड शेअर करण्याची परवानगी आहे.
कसे काम करेल हे फीचर?
हे फीचर रोलआउट झाल्यावर तुम्हाला एक शेअर बटण दिसेल. त्यावर तुम्ही टॅप केल्यानंतर तुमच्या घरातील इतर सदस्यांच्या नावांसह त्यांच्या प्रोफाइल इमेजसह शेअरशीट उघडेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड कोणासोबत शेअर करायचा आहे ते तुम्ही निवडू शकता आणि नंतर तो पाठविण्यासाठी शेअर बटणावर टॅप करा. जेव्हा तुम्ही पासवर्ड शेअर करता, तेव्हा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्याची एक कॉपी (प्रत) त्यांच्या गूगल पासवर्ड मॅनेजरमध्ये दिसेल.
आधीच्या गूगल पासवर्ड मॅनेजर अकाउंटमध्ये तुमची लॉगिन माहिती जतन केली असल्यास नवीन फीचर वेबसाइट आणि ॲप्लिकेशनसह कार्य करील. मात्र, सध्या क्रोमच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये हा पर्याय दिसत नाही. गूगल पासवर्ड मॅनेजरद्वारे पासवर्ड सामायिक करण्याचे नवीन फीचर्स ‘फक्त फॅमिली ग्रुपसाठी’ मर्यादित आहे. त्याशिवाय गूगल काही उदाहरणे हायलाइट करते की, नवीन फीचर्समध्ये ‘मुलाच्या शाळेतील असाइनमेंटमध्ये पालकांना प्रवेश देणे’ उपयुक्त ठरेल.