scorecardresearch

Premium

रेल्वेने प्रवास करताय? IRCTC कडून अलर्ट जारी, फक्त ‘ही’ एक चूक करू नका, नाहीतर…

आयआरसीटीसीने अलर्ट जारी केला आहे आणि माहिती दिली आहे की, आयआरसीटीसी…

IRCTC train ticket
रेल्वेचं तिकीट ऑनलाइन बुक करताय? (Photo-financialexpress)

IRCTC Update: अलिकडे प्रत्येकजण ‘घंटोका काम मिंटोमे’ करण्याच्या वेगात पळतोय. मात्र, एखाद्या कामात पारदर्शकता किंवा अचूकता नसली की आपली फसगत शंभर टक्के होणार. कारण तुमच्या अवती भोवतीचं जग इतक्या फसवेगीरीचं आहे की, तुम्हाला तुमची फसवणूक झालीये याचा थांगपत्ता सुध्दा लागणार नाही. म्हणूनच की काय, या ऑनलाईन टिकीटांचा काळाबाजार टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने दखल घेतली आहे. भारतीय रेल्वेचे अधिकृत ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टल IRCTC ने आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ‘या’ सुचनांंच पालन न करणे म्हणजे बँक खाते रिकामे करणे होय. म्हणून बातमी काळजीपूर्वक वाचा…

तुमच्या मोबाईलवर असं नोटीफीकेशन येते का?

आयआरसीटीसीच्या रिपोर्टनुसार, आपल्या मोबाईलवर ‘irctcconnect.apk’ अॅप डाउनलोड करा या प्रकारचा मॅसेज, नोटीफीकेशन आला असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटी वाजलीच म्हणून समजा. असल्या नोटीफीकेशन तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी येतात. आयआरसीटीसीनं आपल्या वापरकर्त्यांना irctcconnect.apk नावाचं संशयास्पद अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही जर त्यांच्या मॅसेजला पॉझिटीव्ह प्रतिक्रीया दिली तर तुमची फसगत नक्कीच होणार. हे ॲपव्हॉट्सॲप, टेलिग्राम अशा प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरुन पाठवलं जात आहे. दरम्यान, आयआरसीटीसीनं सांगितल्याप्रमाणे हे ॲप तुमच्या फोनसाठी धोक्याचं असून हे इन्स्टॉल केल्यास तुमचा फोनतर खराब होईलच, तसंच फोन हॅक होऊन तुमचं बँक अकाउंटच लुटलं जाऊ शकतं असंही म्हटलं गेलं आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

(हे ही वाचा: मोठी बातमी! तुमचे स्मार्टफोन धोक्यात? Google Play Store वरील ६० Android Apps मध्ये सापडला ‘हा’ नवा मालवेअर)

त्यांनी ‘हे’ विचारलं तर अजिबात उत्तर देऊ नका

आयआरसीटीसीने म्हटले आहे की, ते कधीही त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांचा खाते क्रमांक, एटीएम कार्ड तपशील, पिन क्रमांक किंवा ओटीपी क्रमांक फोन किंवा ईमेलवर विचारत नाही. एवढेच नाही तर, रद्द केलेल्या तिकिटांच्या परताव्यात IRCTC कधीही आपल्या वापरकर्त्यांना कॉल, संदेश किंवा ईमेलद्वारे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती विचारत नाही. तरीही तुम्हाला याची विचारणा होत असेल तर, ते फेक अॅप आहे हे वेळीच लक्षात घ्या.

ऑनलाइन तिकीट बुकींग करतांना फक्त ‘ही’ काळजी घ्या

आयआरसीटीसीने आपल्या सल्लागारात म्हटले आहे की, सायबर फसवणुकीत सामील असलेले लोक या अॅपद्वारे लोकांकडून त्यांची गोपनीय आणि वैयक्तिक माहिती जसे की UPI तपशील, बँकिंग तपशील इत्यादी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि असे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका, ज्यामुळे तुम्ही सायबर फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याला बळी पडता. भारतात ट्रेनचे ऑनलाइन तिकीट बुक करण्‍यासाठी IRCTC हे एकमेव प्‍लॅटफॉर्म आहे. IRCTC शिवाय तुम्ही इतर कोणत्याही अॅपवरून रेल्वे तिकीट बुक करू शकत नाही. जर तुम्ही IRCTC व्यतिरिक्त इतर कोणत्याही अॅप किंवा प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला IRCTC खात्याचा आयडी, पासवर्ड देखील द्यावा लागेल.

वरिल आयआरसीटीसीच्या सुचनांचं पालन योग्य पध्दतीनं केल्यास कुठल्याही ऑनलाईन फसवणूकीला तुम्ही बळी पडणार नाहीत. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अटी व सुचनांचे पालन करा व आपला प्रवास सुखकर करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-04-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×